Benefits Of Raw Turmeric: एक-दोन नव्हे तर अनेक समस्या कच्च्या हळदीने होतात दूर, जाणून घ्या फायदे!-what are the health benefits of drinking raw turmeric tea ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Benefits Of Raw Turmeric: एक-दोन नव्हे तर अनेक समस्या कच्च्या हळदीने होतात दूर, जाणून घ्या फायदे!

Benefits Of Raw Turmeric: एक-दोन नव्हे तर अनेक समस्या कच्च्या हळदीने होतात दूर, जाणून घ्या फायदे!

Feb 26, 2024 11:15 AM IST

Health benefits of Raw Turmeric: नॉर्मल हळद तर आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतोच पण तुम्ही कधी कच्ची हळद खाल्ली आहे का? त्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? चला जाणून घेऊयात.

what are the health Benefits Of Drinking Raw Turmeric Tea
what are the health Benefits Of Drinking Raw Turmeric Tea (freepik)

Benefits Of Drinking Raw Turmeric Tea: हळद हा भारतीय स्वयंपाक घरातील फार महत्त्वाचा मसाला आहे. हळदीची औषधी मसाल्यांमध्ये केली जाते. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. याशिवाय यामध्ये कर्क्यूमिन असते जे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. मसाला म्हणून हळद फायदेशीर आहेच, पण कच्ची हळदही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. कच्ची हळद शरीराला अनेक समस्यांपासून वाचवते. कच्च्या हळदीचा चहा तुम्ही बनवून त्याचे सेवन करू शकता. चला जाणून घेऊयात कच्च्या हळदीच्या चहाचे आरोग्य फायदे.

कच्च्या हळदीचा तसेच खाण्यापेक्षा तुम्ही कच्च्या हळदीचा चहा बनवू शकता. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, कर्क्युमिन आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने शरीराला चरबी जाळण्याचे गुणधर्म देखील मिळतात.

कसा बनवायचा हा चहा?

चहा बनवण्यासाठी कच्ची हळद बारीक करून एक कप पाण्यात घाला. पाणी शिजल्यावर ते गाळून बाहेर काढावे. कच्च्या हळदीचा चहा तयार आहे.

हे आहेत कच्च्या हळदीचे फायदे

> कच्च्या हळदीच्या चहाचे फायदे पचन सुधारण्यासाठी होतो. कच्ची हळद पचनसंस्थेतील चरबी नष्ट करते आणि शरीराला पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते.

> कच्च्या हळदीचा चहा प्यायल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते.

> मधुमेहाच्या रुग्णांना या चहाचा फायदा होतो.

> कच्च्या हळदीच्या चहाचे फायदे सूज कमी करण्यासाठी देखील होतात.

> वजन कमी करण्यासाठीही कच्च्या हळदीचा चहा पिऊ शकता.

> कच्च्या हळदीतील फॅट बर्निंग एन्झाईम्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

> कच्च्या हळदीचे त्वचेवर अनेक फायदे आहेत. कच्च्या हळदीचा चहा प्यायल्याने जखम लवकर बऱ्या होतात, डाग कमी होतात आणि पिंपल्सची समस्या कमी होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग