मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Benefits: भाज्यांमध्ये वापरण्यात येणारे या मसाल्याचे पाणी खूप फायदेशीर!

Health Benefits: भाज्यांमध्ये वापरण्यात येणारे या मसाल्याचे पाणी खूप फायदेशीर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 16, 2024 10:15 AM IST

Bay leaf benefits: ही कोरडी पाने चवीसोबतच तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला त्यांच्या फायद्यांबद्दल जाणून घ्या.

what are the health benefits of bay leaf
what are the health benefits of bay leaf (freepik)

Health Care: भाज्यांची चव वाढवण्यासाठी अनेक मसाले वापरले जातात. प्रत्येक मसाल्याची एक वेगळी चव असते. यासोबतच या मसाल्यांचे अनेक फायदे असतात. लोक तमालपत्राचा वापर आपल्या रेसिपीमध्ये नक्कीच करतात. भाजी पासून ते बिर्याणीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये हे पान वापरले जाते. चवीसोबतच ही कोरडी पाने तुम्हाला निरोगी ठेवतात हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात तमालपत्राटाचे फायदे.

कसं बनवायचं तमालपत्राचं पाणी?

पॅनमध्ये २ ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा, थोडे गरम झाल्यावर त्यात दोन तमालपत्र टाका, नंतर चांगले उकळू द्या. यानंतर, ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि ते थंड झाल्यावर, हळू हळू एक एक घोट घेऊन प्या.

World Kidney Day 2024: किडनीचे गंभीर आजार टाळण्यासाठी या सवयी अंगीकारा!

काय मिळतात फायदे?

> तमालपत्रात जास्त प्रमाणात फायबर असते. यामुळे तुमचे पोट भरलेले जाणवेल. याच्या मदतीने तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.

> यामुळे तुमचे पोट खराब होणार नाही. याशिवाय तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.

> या पानात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Orange Health Benefits: खा भरपूर संत्री आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे!

> हृदय रुग्णांसाठी तमालपत्र उत्तम आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

> तमालपत्र मधुमेहासाठी फायदेशीर आहे कारण ते अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे इंसुलिन स्राव वाढवून रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत करते.

> तमालपत्र तेल त्याच्या दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे संधिवातसदृश संधिवात आराम देण्यासाठी ओळखले जाते. तमालपत्राच्या तेलाने सांध्याची मालिश केल्याने वेदना आणि सूज यापासून आराम मिळतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)