Health Care: बदाम रोज खायला हवेत असं सांगितलं जातं. हा अतिशय ताकदवर सुका मेवा आहे. यामध्ये चांगले फॅट्स ओमेगा ३, व्हिटॅमिन ई, बी, बी२, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर आणि झिंक यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदामाचे दररोज सेवन करणे फायदेशीर मानले जाते. याचे तेल देखील गुणांचा खजिना आहे, याचा वापर करून तुम्ही आरोग्य आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. दररोज बदाम भिजवून खा. याचे अगणीत फायदे मिळतात. दामाचे तेल देखील पोषक तत्वांचा खजिना आहे आणि ते तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्त करू शकते. चला तर मग जाणून घेऊया ते वापरण्याचे काही मार्ग.
स्किन केअरसाठी बदाम तेल फार महत्त्वपूर्ण ठरते. तुम्ही रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्याला बदामाच्या तेलाने मसाज करा. यामुळे सुरकुत्या, निस्तेजपणा यासारख्या अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी करता येतात. यामुळे तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो. तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते. बदामाचे तेल मुरुम, टॅनिंग आणि रंग सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरते.
हाडांचे आरोग्य राखण्यासाठी देखील बदामाचे तेल उत्कृष्ट मानले जाते. हे स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते. लहान मुलांची मालिश करण्यासाठी बदामाचे तेल देखील उत्कृष्ट मानले जाते. हे स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते. या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.
जर एखाद्या व्यक्तीला नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा बदामाचे तेल प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होण्यास मदत होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या