मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Jaiphal Benefits: जायफळ मसाला या आजारांवर ठरतो गुणकारी, जाणून घ्या त्याचे फायदे!

Jaiphal Benefits: जायफळ मसाला या आजारांवर ठरतो गुणकारी, जाणून घ्या त्याचे फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 12, 2024 01:44 PM IST

Nutmeg benefits: जायफळाचा उपयोग स्वयंपाकाव्यतिरिक्त अनेक रोगांच्या उपचार करण्यासाठी केला जातो.यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

What are the benefits of nutmeg
What are the benefits of nutmeg (freepik)

Nutrients in Utmeg: जायफळ प्रसिद्ध भारतीय मसाला आहे. हा भारतीय घरात सहज सापडणारा मसाला आहे. हा एक औषधी मसाला आहे. याचा उपयोग स्वयंपाकाव्यतिरिक्त अनेक रोगांच्या उपचार (health Care) करण्यासाठी केला जातो.यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये कॅल्शियम , फॉस्फरस, मॅग्नेशियम , पोटॅशियम आणि सोडियम आणि मॅंगनीज असते. जायफळ संपूर्ण किंवा बारीक करून वापरले जाते. बारीक केलेले जायफळ साधारणपणे प्रत्येक किराणा दुकानात मिळतात. आज आम्ही तुम्हाला या मसाल्याच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत.

मिळतात हे फायदे

> तणाव दूर करण्यासाठी देखील जायफळ खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने चिंता कमी होण्यास मदत होते.

> हा मसाला वेदना कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. तसेच सांधेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

> जायफळ निद्रानाशाची समस्या दूर करण्यासही मदत करतो.

> या मसाल्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

> जायफळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करते.

> सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठीही याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. चहामध्ये मिसळून तुम्ही या मसाल्याचे सेवन करू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel