Marriage Tips: लग्न योग्य वयात होणे गरजेचे आहे असं नेहमीच बोललं जातं मुलं आणि मुली तरुण झाल्यावर पालकांना त्यांच्या लग्नाची चिंता वाटू लागते. मुलं जॉब सुरु करताच लग्नाचे दडपण दुप्पट होते. प्रत्येक नातेवाईक वेळेवर लग्न करण्यासाठी तरुणांवर दबाव आणू लागतात. मित्र-मैत्रिणीचं लग्न झालं असेल तर वेगळं दडपण येते. या सगळ्यात उशिरा लग्न कर असं म्हणणारा क्वचितच असेल! पण चुकीच्या व्यक्तीशी घाईगडबडीत लग्न करण्यापेक्षा उशिरा लग्न करणे चांगले.
>आजची तरुणाई कोणत्याही परिस्थितीत जुळवून घ्यायला तयार नाहीये. त्यांना असा जीवनसाथी हवा असतो जो त्याच्यासारखा विचार करतो. यात काहीच चुकीचे नाही विचार जुळले नाहीत तर लग्न टिकायचे चान्सेस कमी असतात म्हणूनच, जीवनसाथी शोधण्यासाठी वेळ घ्या अशा जोडीदाराची निवड करा ज्याची विचारसरणी तुमच्या विचाराशी जुळते
>उशीरा लग्न केल्यास मैच्योरिटी लेव्हल उत्तम असते यामुळे लग्नानंतर काही जुळवाजुळव करावी लागली तर जोडप्यांना एकमेकांच्या गरजा समजतात.मैच्योरिटी लेव्हल लग्न टिकवून ठेवते . ते दु:खात आणि सुखात चांगले भागीदार ठरतात.
>उशिरा लग्न केल्याने जोडपे विवाहित जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेतात. एकमेकांचा आदर करा, प्रत्येक निर्णयात एकमेकांना पूर्ण साथ द्या. कुटुंब नियोजनासारख्या मुद्द्यांवर त्यांच्या संमतीने जीवन सुरळीत चालते.
>उशिरा लग्न केल्याने तुम्हाला तुमचे करिअर पुढे घेऊन जाण्यासाठी वेळ मिळतो. अनेकांना त्यांच्या क्षेत्रात पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतरच त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करायचे आहे. त्यामुळे आता उशिरा लग्न होणे सामान्य आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या