Makhana Health Benefits: मखाणा म्हणजे कमळाच्या बिया. या बिया फारच पोषणयुक्त असतात. उपवासाच्या वेळी मखाणाचे सेवन केले जाते. हे उपवासाच्या वेळी उत्साही ठेवण्यास खूप मदत करते. याच कारणांमुळे उपवासाच्या वेळी हे खायला आवडते. मखाणा पासून अनेक रेसिपी बनवल्या जातात. पण अनेकजण मखाणा भाजून खातात. आज आम्ही या लेखातून सांगणार आहोत की मखाणा भाजून खाण्याचे काय फायदे आहेत.
> मखाणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते.
> मखाणा स्किन केअरमधेही उत्तम ठरते. मखाणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. हे अँटी एजिंग फूडसारखे काम करते.
> मखाणामध्ये आढळणारे केम्पफेरॉल नावाचे रसायन त्वचा घट्ट करण्यासाठी आणि काळे डाग हलके करण्यासाठी चांगले काम करते.
> मखाणा तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही राखते.
> मखाणा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
> वजन कमी करण्यासाठी मखाणा देखील खूप उत्तम मानला जातो
> मखाणा शरीरात जळजळ कमी होते. यामुळे तुम्हाला हलके वाटते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)