ओट्स खाणे हे शरीरासाठी खूप चांगले असते. ते अतिशय पौष्टिक आणि शरारीसाठी निरोगी असतात असे म्हटले जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. हे फायबर पचनास मदत करतात आणि बराच वेळ ऊर्जा देतात. त्यामुळे ओट्स खाल्याने भूक ही लागत नाही. बहुतेक फिटनेस फ्रीक नाश्त्यात ओट्स खाणे पसंत करतात. त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.
ओट्स हे प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहेत. हे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यासोबतच फायबर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, खनिजे आणि बी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे ओट्स खाणे शरीरासाठी चांगले असल्याचे म्हटले जाते. आता हे ओट्स खाण्याचे काय आहेत फायदे चला जाणून घेऊया...
वाचा : अनन्या पांडेप्रमाणेच पातळ लोकही ‘या’ योगासनांनी वाढवू शकतात वजन
१. ओट्समध्ये बीटा-ग्लूकन नावाचे फायबर असते. हे कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. तसेच आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
२.इतर धान्यांच्या तुलनेत ओट्समध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
वाचा : गॅस सिलिंडर लवकर संपतो का? फॉलो करा ‘या’ टिप्स, महिन्यापेक्षा जास्त काळ टिकेल
३. ही संयुगे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात, संभाव्यत: तीव्र आजारांचा धोका कमी करतात.
४. ओट्समध्ये असलेले फायबर आणि प्रथिने भूक वाढवतात, ज्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांना मदत होते.
वाचा : पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होत असेल तर करा 'ही' योगासने, समस्या होईल दूर
५. ओट्समधील बीटा-ग्लूकन रक्तातील साखरेचे नियमन सुधारू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा किंवा मधुमेह असलेल्या लोकांना फायदा होतो.
वाचा : लग्नापूर्वी चेहऱ्यावर चमक आणायची? मग हा ज्यूस प्यायला नक्की सुरुवात करा
ओट्स हे शक्यतो सकाळी उठल्यानंतर नाश्तामध्ये खावेत. सकाळी ओट्स खाण्यासाठी ते रात्रभर थोडे पाणी आणि दूध घालून फ्रीजमध्ये ठेवावेत. ते रात्रभर सर्व द्रव्य शोषून घेतात. सकाळी मऊ झालेले ओट्स खावेत. जर तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये चिया बी, दही, काही फळे टाकून खावीत.