Places To Visit In Maldives: काही काळातच मालदीव फारच प्रसिद्ध झालं. तिकडेच निळेगार पाणी आणि लोभनीय दृश्य सगळ्यांचं आकर्षित करत आहे. मालदीवचे समुद्रकिनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. प्रत्येक पर्यटकाला येथील समुद्रकिना-यावर जावंस वाटतं. हे गेल्या काही वर्षात सगळ्यात जास्त आवडले जाणारे हनिमून डेस्टिनेशन आहे. जगभरातील जोडपी हनिमूनसाठी मालदीवमध्ये जातात. मालदीव हा दक्षिण आशियातील एक देश आहे आणि तो हिंदी महासागरात स्थित आहे. हा एक बेट देश आहे, जो पर्यटकांना आकर्षित करतो. या ठिकाणांबद्दल अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
> मालदीव हा हिंदी महासागरात वसलेला एक आयलंड देश आहे जो दक्षिण आशियामध्ये स्थित आहे.
> इथे असलेल्या बेटांमध्ये झालेल्या उत्खनन केलेल्या ठिकाणी बौद्ध अवशेषांवरून हे स्पष्ट होते की हे बेट बौद्ध धर्माचे अनुयायी होते.
> मालदीवमधील रहिवाशांनी ११५३ मध्ये इस्लामचा स्वीकार केला होता.
> मालदीव हा मुस्लिम देश आहे, त्यामुळे तुम्ही इथल्या मशिदींना भेट देत असाल तर महिलांना डोके झाकणे अनिवार्य आहे. पुरुषांनी लहान कपडे घालणे इथे टाळले जाते.
> ५५८ मध्ये, पोर्तुगीजांनी मालदीववर आक्रमण केले आणि १५ वर्षे येथे राज्य केले.
> मालदीववर डच, नंतर ब्रिटीशांचे राज्य होते आणि १९६५ मध्ये मालदीवला ब्रिटिशांपासून पूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळाले.
> इब्राहिम नासेर यांची मालदीवच्या दुसऱ्या प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
> मालदीवच्या वस्ती असलेल्या बेटांमध्ये दारू पिऊ शकत नाही. पण तुम्ही रिसॉर्टमध्ये पर्यटक मद्यपान करू शकतात.
> मालदीवची राष्ट्रीय भाषा दिवेही आहे. या भाषेच्या वेगवेगळ्या बोली आहेत.
> मालदीवमध्ये, पर्यटक माले, बनाना रीफ आणि वधू बेट इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)