Walnut Benefits: उन्हाळ्यात अक्रोड भिजवून खावेत की असेच खावेत? काय आहेत फायदे जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Walnut Benefits: उन्हाळ्यात अक्रोड भिजवून खावेत की असेच खावेत? काय आहेत फायदे जाणून घ्या

Walnut Benefits: उन्हाळ्यात अक्रोड भिजवून खावेत की असेच खावेत? काय आहेत फायदे जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 08, 2024 02:26 PM IST

Walnut Benefits: यंदा उन्हाळ्यात सगळीकडे उष्णतेची लाट पाहायला मिळते. अशात काय खावे आणि काय खाऊ नये असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया...

Walnuts Benefits
Walnuts Benefits (Freepik )

शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळावीत यासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. अनेकजण रोजच्या आहारात सुका मेवा देखील खाताना दिसतात. सुका मेवा खाल्यामुळे पोषक तत्वे मिळतात. त्यामध्ये अक्रोडचा देखील समावेश असतो. पण हे अक्रोड पाण्यात भिजवून खावेत की तसेच खावेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात अक्रोड खाताना कसा खावेत.

अक्रोडमध्ये कोणते जीवनसत्व असते?

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. याशिवाय अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. त्यामुळे अक्रोड खाल्याने शरीराला योग्य ती जीवनसत्वे मिळतात.
वाचा: का साजरा केला जातो नॅशनल बेस्ट फ्रेंड डे? हा आहे इतिहास आणि महत्त्व

अक्रोड भिजवून खावेत की असेच खावेत?

उन्हाळ्यात अक्रोड भिजवलेले खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अक्रोड भिजवल्यामुळे त्यामधील उष्णता कमी होते. त्यामुळे अक्रोड खाण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत टाकवेत. असे केल्यामुळे त्यामधील उष्णता कमी होते आणि पोष्टीक घटक वाढतात. मात्र, हिवाळ्यात अक्रोड खाताने भिजत घालू नयेत. ते तसेच खावेत.
वाचा: वेळीच सावध व्हा! ब्रेन ट्यूमरचे प्रमाण का वाढत आहे? काय आहे कारण वाचा

दिवसभरात किती अक्रोड खावेत?

जास्त अक्रोड खाल्याने शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात केवळ २ ते ३ अक्रोड खावेत. लहान मुलांना केवळ एक अक्रोड दिवसभरात खायला द्यावा. पण दररोज अक्रोड खाल्याने शरीराला फायदा होतो.
वाचा: तुम्हाला माहीत आहे का वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे साजरा करण्याचा उद्देश? वाचा महत्त्वाच्या गोष्टी

अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत?

अक्रोड हे अँटिऑक्सिडंट्सने युक्त आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. अक्रोडला कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ देखील मानले जाते, ज्यामुळे त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने देखील भरपूर ऊर्जा मिळते. यामुळे छातीती जळजळ कमी होते. अक्रोडातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे वाढते वजन कमी होण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner