मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Papaya Benefits: वजन कमी करण्यापासून पचन सुधारते पपई, रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे

Papaya Benefits: वजन कमी करण्यापासून पचन सुधारते पपई, रोज रिकाम्या पोटी खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 05, 2024 04:19 PM IST

Healthy Eating Tips: तुमच्या रोजच्या आहारात हंगामी फळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. रोज रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कोणते ते जाणून घ्या.

पपई खाण्याचे फायदे
पपई खाण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Eating Papaya: निरोगी राहण्यासाठी नियमित फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पण बहुतेक लोकांना असे वाटते की फक्त सफरचंद सारखी फळेच फायदेशीर आहेत. पण आहारात हंगामी फळांचा समावेश केल्यास अधिक फायदे होतात. हिवाळ्यात पपई बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. ही गोड पपई सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्याचे अनेक आरोग्य फायदे होतात. जाणून घ्या रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम

पपईमध्ये पपेन एन्झाइम भरपूर प्रमाणात असते. ज्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी आपल्या आहारात पपईचा समावेश करावा. जेव्हा तुमचे पोट रिकामे असेल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी पपई खा. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

शरीरात पोषण शोषून घेण्याची क्षमता वाढवते

जेव्हा आपण रिकाम्या पोटी पपई खातो तेव्हा त्यातील आवश्यक पोषण शरीर सहज आणि लवकर शोषून घेते. कारण जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा शरीरासाठी एकमेव फळ म्हणजे पपई असते. ज्याचे पोषण शरीराला मिळते आणि पूर्णपणे फायदा करतो.

ब्लड शुगर लेव्हल स्थिर करते

जेवणानंतर दोन तासांनी पपई खाल्ल्यास शरीरातील ग्लायसेमिया नियंत्रणास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची किंवा कमी होण्याची शक्यता नसते.

भूक कमी करते

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल आणि तुमची भूक भागवणारी फळे खायची असतील तर नियमित पपई खा. यातील फायबरचे प्रमाण पोट भरलेले ठेवते आणि मेंदूलाही पोट भरल्याचे संकेत देते.

 

ब्लॉटिंग प्रतिबंधित करते

जेवण केल्यानंतर लोकांना बऱ्याचदा पोट जड होणे आणि ब्लॉटिंगची समस्या उद्भवते. अन्न खाल्ल्यानंतर दोन तासांनी पपई खाल्ल्यास पोट फुगण्याची आणि ब्लॉटिंगची समस्या उद्भवत नाही. कारण पपई अन्न पचवणारे एन्झाइम तयार करते. त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते. नियमित पपई खाल्ली पाहिजे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel