Health Benefits of Eating Cucumber: दैनंदिन जीवनात बहुतेक लोक सलाद म्हणून काकडीचे सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का काकडी केवळ तुमच्या चवीचीच नाही तर तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेते. काकडीच्या मदतीने तुम्ही वाढत्या वजनापासून रक्तातील साखरेच्या पातळीपर्यंत नियंत्रण ठेवू शकता. काकडीमध्ये असलेले प्रथिने, फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, फोलेट, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स यासारख्या पोषक घटकांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करता येते. चला तर मग जाणून घेऊया रोज काकडीचा आहारात समावेश केल्याने कोणते आश्चर्यकारक फायदे होतात.
काकडीत असलेले फ्लेव्होनॉइड्स, लिग्नन्स आणि ट्रायटर्पेन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स शरीराचे पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकून शरीरात तयार होणाऱ्या हानिकारक पदार्थांपासून पेशींचे संरक्षण करतात.
काकडीमध्ये असलेले ९५ टक्के पाणी शरीराला हायड्रेट करून शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. काकडीत असलेले पॅन्टोथेनिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी ५ चे उच्च प्रमाण मुरुमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
काकडीत पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर असते, जे आतड्यांची हालचाल वाढवते आणि त्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवते. काकडीमध्ये असलेले हे फायबर आतड्यांसंबंधी हालचाली नियंत्रित करून बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते. याशिवाय काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने शरीर हायड्रेटेड राहते. हायड्रेशनमुळे मल सुसंगतता सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
जर तुम्ही वजन कमी करत असाल तर वेट लॉससाठी रिकाम्या पोटी काकडीचे पाणी पिऊ शकता. काकडीमध्ये कॅलरी कमी आणि विरघळणारे फायबर जास्त असते. जे हायड्रेशनमध्ये मदत करून भूक कमी करू शकते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
काकडीमध्ये असणारे पोषक घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.
अनेकदा शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे व्यक्तीला रक्तदाबाचा त्रास होऊ लागतो. काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात पोटॅशियम असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी खूप फायदेशीर मानली जाते. यात असलेले बिटासिन शरीरात इन्सुलिन तयार होण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. याशिवाय कमी ग्लाइसेमिक इंडेक्स आणि त्यात असलेले फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)