मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut Water Benefits: वेट लॉसपासून बीपी नियंत्रित करते नारळ पाणी, मिळतात हे फायदे

Coconut Water Benefits: वेट लॉसपासून बीपी नियंत्रित करते नारळ पाणी, मिळतात हे फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 03, 2024 03:04 PM IST

Summer Health Care Tips: उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराचे डिहायड्रेशन थांबते. एवढेच नाही तर याचे नियमित सेवन केल्याने व्यक्तीला अनेक फायदे देखील मिळतात. कोणते ते जाणून घ्या.

नारळ पाणी पिण्याचे फायदे
नारळ पाणी पिण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Drinking Coconut Water: उन्हाळा सुरू होताच लोकांना अशा काही पेयांचा आहारात समावेश करणे आवडते जे टेस्टी असण्यासोबतच त्यांच्या शरीराला हायड्रेटेड ठेवतात. अशाच एका टेस्टी समर ड्रिंकमध्ये नारळ पाण्याचाही समावेश आहे. उन्हाळ्यात नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील डिहायड्रेशन थांबते. इतकेच नाही तर त्याचे नियमित सेवन केल्याने केवळ पचनक्रिया सुधारत नाही तर नको असलेल्या लठ्ठपणापासून देखील मुक्ती मिळू शकते. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे होतात.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

लठ्ठपणा नियंत्रणात ठेवते

नारळाच्या पाण्यात असलेल्या फायबरचे प्रमाण जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत करते. यामुळे व्यक्तीला वारंवार भूक लागत नाही आणि तो जास्त खाणे टाळतो. त्यामुळे त्याचे वजन नियंत्रणात राहते.

शरीराला हायड्रेटेड ठेवते

कॅलरी आणि कार्बोहायड्रेट कमी असण्यासोबतच नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक देखील असतात. रिकाम्या पोटी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. ज्यामुळे व्यक्ती थकवा, सुस्ती, अशक्तपणा आणि चक्कर यासारख्या समस्यांपासून दूर राहते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी नारळ पाणी वरदानापेक्षा कमी नाही. नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

मसल्स क्रॅम्प प्रतिबंधित करते

मसल क्रॅम्प ही एक सामान्य समस्या आहे जी व्यायाम किंवा इतर क्रियाकलापांदरम्यान उद्भवू शकते. पण नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक मसल्स क्रॅम्पला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. नारळाच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)