benefits of Papaya Seeds: चांगल्या आरोग्यापासून ते सुंदर त्वचेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पपईचे अनेक वेळा सेवन केले असेल. पपईमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारे फायदा होतो. पपईच्या या आरोग्यदायी फायद्यांविषयी बहुतेकांना माहिती आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, पपईच्या बिया, ज्यांना लोक निरुपयोगी समजून कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. पण, त्यात फायबर, हेल्दी फॅट, प्रोटीन, झिंक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. इतकंच नाही तर, त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमसह अनेक खनिजे आढळतात. पपईच्या बियांमध्ये असलेले हे सर्व पोषक घटक लठ्ठपणापासून ते मधुमेहापर्यंतच्या समस्यांवर सहज नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
जर, तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असाल, तर तुमच्या आहारात पपईच्या बियांचा समावेश करा. पपईच्या बियांमध्ये असलेले हाय फायबर वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि व्यक्तीला जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहतो.
पचनसंस्थेशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी डॉक्टर पपईचे सेवन करण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि या समस्येपासून लवकर सुटका हवी असेल तर, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया देखील फायदेशीर ठरू शकतात. वास्तविक, पपईच्या बियांमध्ये असलेले रेचक गुणधर्म बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. याशिवाय पपईच्या बियांमध्ये असलेले पपेन नावाचे विरघळणारे फायबर आणि एन्झाइम पोट साफ ठेवून अन्न लवकर पचण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
पपईच्या बियांमध्ये असलेले कार्पेन नावाचे तत्व आतड्यांतील जंत आणि बॅक्टेरिया मारून बद्धकोष्ठतेपासून आराम देऊन पचनसंस्थेचे आरोग्य सुव्यवस्थित राखते. अनेक मेडिकल रिसर्च रिपोर्टनुसार, पपईच्या बियांमध्ये असलेले प्रोटीओलाइटिक एन्झाइम आतड्यांमध्ये राहणारे बॅक्टेरिया मारतात, ज्यामुळे पोट निरोगी राहते.
केवळ पपईच नाही तर, त्याच्या बियांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. पपईच्या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती थोडी मंदावते होते, त्यामुळे रक्तात साखरेचे शोषण कमी होते. सोप्या शब्दात, स्वादुपिंडला इन्सुलिन तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
पपईच्या बिया देखील सूज कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल्स सारखी अनेक संयुगे असतात. हे सर्व संयुगे दाहक-विरोधी गुणधर्म असणारी आहेत आणि संधिवात इत्यादींमध्ये सूज कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
पपईच्या बियांचे सेवन करण्यासाठी तुम्ही त्याची पावडर स्मूदी, ज्यूस, दलिया इत्यादीमध्ये मिसळून खाऊ शकता. याशिवाय या बिया सकाळी एक ग्लास पाण्यासोबत खाऊ शकतात.
संबंधित बातम्या