Weight Loss Tips: खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? 'या' गोष्टी पाळल्यास वेगाने घटेल
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? 'या' गोष्टी पाळल्यास वेगाने घटेल

Weight Loss Tips: खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? 'या' गोष्टी पाळल्यास वेगाने घटेल

Published Aug 02, 2024 08:25 AM IST

Weight Loss Tips In Marathi: अनेकांना प्रयत्न करूनही वजनवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. आज आपण वजन घटवताना कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे त्याबाबत जाणून घेणार आहोत.

Weight Loss Mistakes: खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय?
Weight Loss Mistakes: खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? (unsplash)

Weight Loss Tips In Marathi: भारतात अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. बदलेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्येच ही समस्या दिसून येते. वजन वाढण्याच्या समस्येला अनेक लोक गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र वजन वाढणे हे अत्यंत त्रासदायक असते. कारण वजन वाढण्याने लोकांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. वजन वाढल्यामुळे अनेक लहान-मोठ्या आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. खानपानात झालेल्या बदलामुळे, ताणतणावामुळे, शरीराची हालचाल मंदावल्याने अशा विविध कारणांमुळे वजन वाढते. परंतु अनेकांना प्रयत्न करूनही वजनवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. आज आपण वजन घटवताना कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे त्याबाबत जाणून घेणार आहोत.

पोषक आहार

वजन कमी करण्यासाठी पोषक आहाराला प्रथम प्राधान्य दिले जाते. यासाठी कोणते अन्न तुमच्यासाठी चांगले आणि कोणते वाईट हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला प्रामुख्याने जास्त प्रथिने आणि कमी कार्बोहायड्रेट्सचे सेवन करावे लागेल. तुम्ही जितके जास्त संतुलित आणि सकस अन्न खाल तितकेच यशस्वीपणे तुम्ही लठ्ठपणावर मात करू शकाल.

नेमके काय खावे?

वजन कमी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय खावे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. उदाहरणार्थ, काही लोक पपई खूप चांगल्याप्रकारे पचवतात तर काहींना ते पचत नाही. या स्थितीत तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता आणि तुम्हाला कशाची गरज आहे हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा रात्री काम करणाऱ्या लोकांचे वजन जास्त असते. त्यामुळे आपल्या शारीरिक गरजेनुसार काय खावे यानुसार पोषक आहार निवडा. खासकरून कडधान्ये, ताजी फळे आणि हिरव्या भाज्या, मासे, अंडी इत्यादींचे सेवन करा. लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज केलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड, जंक फूड, अल्कोहोल, सिगारेट यांचे सेवन करणे लगेच बंद करा.

ताणतणावचे व्यवस्थापन

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला तणाव असेल तर तुमचे वजन कमी होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तणाव असतो पण तो व्यवस्थित हाताळता आला पाहिजे. ताण कमी करण्यासाठी दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. यासोबतच, ध्यान आणि योग हे तणाव आणि नैराश्य दूर करण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. तणाव दूर झाल्यास तुमचे वजन वेगाने कमी होईल.

व्यायाम

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली अत्यंत महत्वाच्या ठरतात. त्यामुळेच तुमचा आहार कितीही आरोग्यदायी असला तरी तुम्ही व्यायाम केला नाही तर तुमचे वजन अपेक्षेप्रमाणे कमी होणार नाही. दिवसातून फक्त ३० मिनिटांचा मध्यम व्यायाम केला तरी योग्य आहे. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, तर चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे, स्कॉट्स, केटलबेल असे व्यायाम करा. शिवाय दररोज दिवसभरात १० हजार पावले चालणे अधिक फायदेशीर ठरेल.

आठवड्यातून एक दिवस विश्रांती

अलिककडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात एकमेकांसोबत स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच जेव्हा कामाचा ताण वाढतो तेव्हा विश्रांतीची नितांत गरज असते. आठवड्यातून एक दिवस पूर्ण विश्रांती घेणे गरजेचे आहे. मात्र या दिवशी इतर व्यसन न करता निसर्गाच्या सानिध्यात, कुटुंबातील व्यक्तींसोबत उत्तम, वेळ घालवणे आवश्यक आहे. अशाने तुमचा ताण दूर होईल.

चांगली झोप आवश्यक

ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली झोप अत्यंत गरजेची आहे. जर तुम्ही नीट झोप घेत नसाल तर तुमच्या कॉर्टिसोलची पातळी वाढते. कॉर्टिसोल पातळी हे तणावाचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अशाने मानसिक स्वास्थ्य तर राहतेच शिवाय वजनही वेगाने कमी होण्यास मदत होते.

Whats_app_banner