Right time to drink green tea: आजकाल बदलेल्या खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करतात. आजच्या काळात अशी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. त्यातीलच एक म्हणजे ग्रीन टी होय.
ग्रीन टीचे फायदे सर्वांनाच माहित आहेत. परंतु त्याच्या कडवट चवीमुळे बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. निरोगी राहण्यासाठी, विशेषत: पचनक्रिया सुधारण्यासाठी ग्रीन टी प्यायची असेल तर त्यात या ३ गोष्टी मिसळून प्या. यामुळे ग्रीन टीची चव सुधारण्यास मदत होईलच शिवाय आरोग्यासाठी ग्रीन टीचे फायदे दुप्पट होतील. अनेक चवीचे ग्रीन टी बाजारात उपलब्ध असले तरी नैसर्गिकरित्या बनवलेला ग्रीन टी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. जाणून घ्या कोणत्या गोष्टीमुळे ग्रीन टीची चव योग्य होईल. शिवाय तुमचे वजनही वेगाने कमी होईल. जेणेकरून यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आवडत्या कपड्यांमध्ये अगदी सडपातळ दिसाल.
ॲपल साइडर व्हिनेगरची चव थोडी आंबट-गोड असते. ग्रीन टीमध्ये घातल्यास ग्रीन टीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते. फक्त एक कप ग्रीन टीमध्ये एक चमचा ॲपल साइडर व्हिनेगर घाला आणि प्या. हे केवळ चवच देत नाही तर वजन कमी करण्याची प्रक्रिया देखील सोपी करते. खरं तर, बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी ॲपल साइडर व्हिनेगर पितात.
ग्रीन टीची चव वाढवण्यासाठी बरेच लोक लिंबाचा रस घालतात. यामुळे चव वाढते तसेच आरोग्याला ही फायदा होतो. लिंबाचा रस ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म वाढवतो. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.
लाल रंगाची द्राक्षे बाजारात सहज उपलब्ध आहेत. ग्रीन टी बनवताना एक द्राक्ष पाण्यात उकळून मग त्यात ग्रीन टी घाला. यामुळे द्राक्षांचा गोडवा आणि चव पाण्यात विरघळणार आहेच, शिवाय ग्रीन टीचा कडवटपणाही कमी होईल. याशिवाय ग्रीन टी देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच तुमची चरबी वेगाने वितळेल. जेणेकरून तुम्ही अगदी सडपातळ दिसाल.
तुम्ही ग्रीन टी चे सेवन केव्हाही करू शकता. पण जर तुम्ही सकाळी याचे सेवन केले तर तुम्हाला अधिक फायदे होतील. याशिवाय ग्रीन टी अन्न खाण्यापूर्वी आणि खाल्यानंतर फक्त ४५ मिनिटांनी प्यावी. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळावे. असे केल्याने तुम्हाला अनेक नुकसानही होऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)