मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे २-२-२चा फॉर्म्युला! जाणून घ्या नक्की काय करायचं...

Weight Loss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे २-२-२चा फॉर्म्युला! जाणून घ्या नक्की काय करायचं...

Jul 02, 2024 04:58 PM IST

Weight Loss Tips In Marathi: झपाट्याने वाढणारा लठ्ठपणा ही आज जवळजवळ सर्वांसाठीच मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकार करत असतात. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा २-२-२चा फॉर्म्युला सांगणार आहोत.

Weight Loss Tips In Marathi
Weight Loss Tips In Marathi

Weight Loss Tips In Marathi: आजच्या धावपळीच्या जीवनात व्यस्त जीवनशैली आणि आरोग्या हानिकारक ठरणाऱ्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणा ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे इतरही अनेक आजार शरीराला घेरतात. एकदा शरीरात चरबी जमा होऊ लागली की, ती कमी करणे खूप अवघड होऊन बसते. वजन कमी करण्यासाठी लोक तासन् तास जिममध्ये घाम गाळतात, काटेकोर आहाराचे पालन करतात. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा २-२-२चा फॉर्म्युला सांगणार आहोत. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

काय आहे ‘२-२-२’ फॉर्म्युला?

सध्या हा ‘२-२-२’ फॉर्म्युला खूपच ट्रेंडमध्ये आहे. याचा अवलंब करून अनेक जण आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही ‘२-२-२’ची वजन कमी करण्याची पद्धत... खरं तर २-२-२ फॉर्म्युल्यात पहिला २ म्हणजे २ ग्लास पाणी, दुसरं २ म्हणजे २ तास शारीरिक हालचाली आणि तिसरं २ म्हणजे दररोज २ हेल्दी डाएट. २-२-२चा हा फॉर्म्युला वापरून पाहिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Zika Virus : पुण्यात आढळले झिका व्हायरसचे रुग्ण, जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय

२ ग्लास पाण्याने वाढेल चयापचय!

पहिल्या २ मध्ये दोन ग्लास पाणी पिण्यास सांगितले आहे. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी २ ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पचनसंस्था संतुलित राहते आणि दिवसभर शरीर हायड्रेटेड व उर्जेने भरलेले राहते. शरीराच्या सुदृढ चयापचय दरामुळे वजन कमी करण्याचा प्रवासही खूप लवकर पूर्णत्वास जाऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

दररोज २ तासांची शारीरिक हालचाल

शरीराचे वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप गरजेचे आहे. नियमित २ तासांच्या शारीरिक हालचालींमुळे शरीरातील कॅलरी बर्न होतील, ज्यामुळे चरबी कमी होईल आणि वजन झटपट कमी होईल. फक्त जिममध्ये जाऊन घाम गाळणे आवश्यक नाही. २ तास शारीरिक हालचालींसाठी तुम्ही सकाळी १ तास योगा करू शकता आणि संध्याकाळी १ तास चालू शकता.

दररोज २ वेळा निरोगी आहार

२-२-२च्या फॉर्म्युलामध्ये तिसरा २ निरोगी आहाराशी संबंधित आहे. यासाठी दररोज २ हेल्दी गोष्टींचा आहारात समावेश करा. तसेच हे देखील लक्षात ठेवा की दररोज जेवणात वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतील. यात हिरव्या भाज्या, तृणधान्ये, बाजरी, फळे, अंडी आणि बरेच काही समाविष्ट करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel