Weight Loss Tips: चपाती खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का, दिवसातून किती चपात्या खाणे योग्य?-weight loss tips should you eat chapati while losing weight or not ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: चपाती खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का, दिवसातून किती चपात्या खाणे योग्य?

Weight Loss Tips: चपाती खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का, दिवसातून किती चपात्या खाणे योग्य?

Aug 29, 2024 10:02 AM IST

Does chapati increase weight: लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की, गव्हाच्या चपात्या खाल्ल्याने वजन वाढत तर नाही ना? किंवा चपात्या किती प्रमाणात खाणं योग्य असतं? आज आपण तुमच्या मनातील याच शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चपाती खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का
चपाती खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का

How many chapati should you eat in a day: भारतीय स्वयंपाकातील एक महत्वाचा घटक म्हणजे चपाती होय. गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. अनेक कुटुंबांमध्ये मुख्य अन्न म्हणून चपाती खाल्लं जातं. पण जेव्हा वजन वाढवायचं किंवा कमी करायचं असतं, तेव्हा लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की, गव्हाच्या चपात्या खाल्ल्याने वजन वाढत तर नाही ना? किंवा चपात्या किती प्रमाणात खाणं योग्य असतं? आज आपण तुमच्या मनातील याच शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आहार तज्ज्ञांच्या मते, आपण दररोज खात असलेल्या गव्हाच्या पिठाच्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटक असतात. याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते आणि तो संतुलित आहाराचा भाग बनू शकतो. परंतु जास्त प्रमाणात किंवा इतर हाय-कॅलरीयुक्त पदार्थांसोबत खाल्ल्यास ते वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, गव्हात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने चपाती खाल्ल्याने वजन वाढते. पण आहार तज्ज्ञांच्या मते, तसं काही नाही. जर तुम्ही तुमच्या रोजच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी वापरत असाल, तर तुमचे वजन वाढू शकते. मग त्या कॅलरीज गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्यांमधून येत असतील किंवा इतर कोणत्याही स्रोतातून. त्यामुळे फक्त चपातीच वजन वाढवण्यासाठी कारणीभूत नसते. चपाती खाऊन पुरेशी शारीरिक हालचाल न करणे आणि चपातीसोबत लोणी, तूप आणि इतर जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन केल्यानेही वजन वाढू शकते.

वजन घटवण्यासाठी दिवसात किती चपात्या खाणे योग्य?

आहार तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर दिवसातून २ ते ३ चपात्या खाणे योग्य ठरू शकते. चपातीचे प्रमाण तुमच्या दैनंदिन कॅलरीच्या गरजा, शारीरिक हालचालींची पातळी आणि तुमची वैयक्तिक पचनक्रिया यावर अवलंबून असते. वास्तविक, निरोगी व्यक्तीला दिवसाला १८०० ते २००० कॅलरीज आवश्यक असतात. गव्हाच्या एका चपातीमध्ये १५ ते १७ ग्रॅम कर्बोदके असतात. तर ३ ग्रॅम प्रथिने आणि ७० ग्रॅम कॅलरीज उपलब्ध असतात.

तसेच मोठ्या चपात्यांऐवजी छोट्या चपात्या खाव्यात. त्यामुळे तुम्ही कॅलरीजचे सेवन कमी करण्यास मदत होते. आणि तरीही तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. गव्हाची चपाती पौष्टिक भाज्या, मसूर आणि कोशिंबीर सोबत खाणे उत्तम असते. यामुळे तुमची भूक भागेल आणि कमी कॅलरींचा वापर होईल. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)