weight loss tips: चपाती हा भारतीय जेवणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे तसेच कार्बोहायड्रेट्स असतात. हे सर्व पोषक घटक शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र हल्ली वाढत्या लठ्ठपणामुळे लोक चपाती खाणे टाळू लागले आहेत. त्यांना वाटते की कमी चपाती खाल्ल्याने त्यांचे वजन कमी होऊ शकते. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, गव्हाची चपाती खाल्ल्याने वजन वाढते. पण वास्तविकता अशी आहे की, चपाती नीट खाल्ल्यास वजन वाढत नाहीत तर वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या पीठात मिसळून त्यांची चपाती बनवू शकता. या चपात्या तुमच्या शरीरात फॅट कटरसारखे काम करतील.
चपाती बनवण्यासाठी गव्हाच्या पिठात नाचणीचे पीठ मिसळू शकता. नाचणीच्या पिठात फायबर आणि अमिनो ऍसिड मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच हे ग्लूटेन फ्रीदेखील आहे. त्याची चपाती खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि ते सहज पचते. नाचणीचे पीठ मिसळून बनवलेली चपाती खाल्ल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगाने वाढते.
या पिठात भरपूर फायबरदेखील आढळते. अशावेळी तुम्ही तुमच्या नियमित गव्हाच्या पिठात ओट्सचे पीठ मिसळू शकता. या पिठापासून बनवलेली रोटी खाल्ल्याने वजन कमी होते. याशिवाय ओट्सच्या पिठापासून बनवलेल्या चपाती मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
गव्हाचे पीठ अधिक निरोगी बनवण्यासाठी बाजरीचे पीठदेखील एक चांगला पर्याय आहे. बाजरीच्या पिठात फायबर आणि प्रथिनांबरोबरच मॅग्नेशियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. पीठ खाल्ल्याने पोट लवकर भरते, जेणेकरून जास्त खाणे टाळता येईल आणि वजन कमी होईल.
ज्वारीदेखील ग्लूटेन-फ्री पीठ आहे.जे प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळते. रक्तातील साखर नियंत्रित करण्याबरोबरच हृदयाशी संबंधित समस्याही दूर होतात. यासोबतच खराब पचनक्रियाही सुधारते. आपण आपल्या नियमित गव्हाच्या पिठात ज्वारीचे पीठ मिसळून निरोगी आणि चवदार चपाती सहज तयार करू शकता.
यामध्ये गव्हापेक्षा खूपच कमी कॅलरी असतात. यासोबतच हे ग्लूटेन फ्री देखील आहे. मक्याच्या पिठात प्रथिने, लोह, फॉस्फरस, झिंक आणि अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होतात. यासोबतच डोळ्यांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. गव्हाच्या पिठात मिसळून तुम्ही चपाती किंवा पराठे तयार करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)