Weight Loss Tips : डायटिंग न करताही झटपट कमी करू शकता वजन! 'या' ६ सोप्या टिप्स येतील कामी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips : डायटिंग न करताही झटपट कमी करू शकता वजन! 'या' ६ सोप्या टिप्स येतील कामी

Weight Loss Tips : डायटिंग न करताही झटपट कमी करू शकता वजन! 'या' ६ सोप्या टिप्स येतील कामी

Dec 23, 2024 10:35 AM IST

Weight Loss Without Dieting Tips : योग संस्थेचे संस्थापक आणि आरोग्य प्रशिक्षक हंसाजी योगेंद्र यांनी उपवास न करता वजन कमी करण्यासाठी काही प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत. चला जाणून घेऊया...

Weight Loss Without Dieting Tips
Weight Loss Without Dieting Tips (FREEPIK)

Weight Loss Without Dieting: वाढत्या वजनामुळे चिंतेत आहात आणि त्यासाठी डायटिंग करत आहात? तर आताच थांबा. डायटिंग न करताही तुम्ही आपलं वजन सहज कमी करू शकता. लठ्ठपणा हा जीवनशैलीचा विकार आहे. म्हणजेच नियमित जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे शरीराचे वजन असंतुलित पद्धतीने वाढू लागते. जेव्हा तुम्ही निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचे पालन कराल, तेव्हा तुम्ही कोणत्याही डायटिंगशिवाय तुमचे वजन नियंत्रित करू शकाल.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे? त्यामुळे काळजी करू नका, योग संस्थेचे संस्थापक आणि आरोग्य प्रशिक्षक हंसाजी योगेंद्र यांनी उपवास न करता वजन कमी करण्यासाठी काही प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत. चला जाणून घेऊया...

दिवसातून फक्त ४ वेळा खा

प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण आपली भूक भागवण्यासाठी अन्न खातो, जबरदस्तीने पोट भरण्यासाठी नाही. तज्ज्ञांनी दिवसातून फक्तवेळ चार जेवण खाण्याची शिफारस केली आहे. त्यापेक्षा जास्त अन्न खाऊ नये. प्रत्येकाने दररोज नाश्ता केला पाहिजे. असे अनेक अभ्यास आहेत, जे असे दर्शवतात की जे लोक न्याहारी करतात त्यांचा बीएमआय नाश्ता न करणाऱ्यांपेक्षा कमी असतो. न्याहारी नेहमी हलकी ठेवा जेणेकरून, तुम्हाला दुपारच्या जेवणात अन्न खाण्याची गरज भासेल. या सोबतच रात्रीचे जेवण नेहमी लवकर करण्याचा प्रयत्न करा. रात्रीचे जेवण संध्याकाळी ७च्या सुमारास घेतले पाहिजे, कारण रात्री उशिरा जेवण केल्याने इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याच वेळी, रात्रीच्या जेवणात खिचडी, सूप इत्यादीसारखे हलके अन्न पर्याय निवडा, ज्यामुळे बॉडी मास इंडेक्स कमी होण्यास मदत होईल.

पुरेशी झोप घ्या

आजच्या जीवनशैलीत लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतात. रात्री वेळेवर झोपा आणि ७ ते ९ तासांची योग्य झोप घ्या, ज्यामुळे शरीरात बाहेर पडणारे हार्मोन्स चयापचय सुधारण्यास मदत करतात. झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणारे घेरलिन आणि लिप्टन संप्रेरक विस्कळीत होतात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि तुमचे वजन वाढू शकते. हार्मोन्समधील चढ-उतारामुळे भूक आणि लालसा वाढते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या वजन वाढते.

दररोज काही वेळ चाला

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर रोज काही वेळ चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दररोज किमान १०००० पावले चालण्याची शिफारस केली जाते, जे अंदाजे ७ ते ८ किलोमीटरच्या समतुल्य आहे. तुम्हाला एकाच वेळी इतके चालण्याची गरज नाही, तुम्ही सकाळी उठल्यापासून थोडे थोडे चालण्यास सुरुवात करू शकता. पावले मोजण्यासाठी पेडोमीटरची मदत घेऊ शकता. जेवण करण्यापूर्वी आणि नंतर काही वेळ चालत जा.

Health Tips: तुमचेही पाय सतत बर्फासारखे थंड असतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

कॅलरीज बर्न करणे महत्वाचे

शरीरात साठलेल्या अतिरिक्त कॅलरीज नियमितपणे बर्न करणे फार महत्वाचे आहे. यामुळे वजन नियंत्रणात मदत होते आणि आजार तुम्हाला त्रास देत नाहीत. कॅलरी बर्न करण्यासाठी, दररोज काही आरोग्यदायी व्यायाम करण्यासाठी वेळ काढा. तालाशन, सूर्यनमस्कार, बलासन यासारख्या काही साध्या स्ट्रेचिंग व्यायामाच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न करू शकता. हे आपल्याला निरोगी वजन व्यवस्थापित करण्यात मदत करते.

काही पदार्थ खाणे टाळा

असे काही अस्वास्थ्यकर पदार्थ आहेत, जे तुमचे वजन अप्रमाणात वाढवू शकतात. जर तुम्हाला उपवास न करता वजन कमी करायचे असेल, तर या पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या आजूबाजूला नेहमीच उपलब्ध असतात, जर ते तुमच्या घरी नसतील तर तुम्ही ते बाजारातून सहज खरेदी करू शकता.चिप्स, पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स इत्यादी टाळणे फार महत्वाचे आहे. हे सर्व नियमित जीवनशैलीचा भाग असू नये, कारण ते अस्वास्थ्यकर उत्पादनांच्या मिश्रणाने तयार केले जातात. ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

सकाळी पाणी प्या

दररोज सकाळी उठल्यानंतर थोडे पाणी प्या आणि मग तुमचे आवडते पेय प्या. विशेषत: जिऱ्याचे पाणी वजन नियंत्रणात अधिक प्रभावीपणे काम करते. यासाठी एक चमचा जिरे पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. जिरे पाण्याचे चयापचय वाढवण्याचे काम प्रभावीपणे करते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner