Pulses for Weight Loss: आज बहुतेक लोकांसाठी वाढती लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक व्यायामासोबतच आहाराकडे विशेष लक्ष देतात. एवढे करूनही वाढते वजन सहजपणे कमी करणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. वजन कमी करण्यात व्यायामापेक्षा हेल्दी डायटचा मोठा वाटा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांना लवकर वजन कमी करायचे आहे त्यांनी प्रथिने आणि फायबरयुक्त आहारासोबत कमी कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करावे. अशा गोष्टींमध्ये काही डाळींही समाविष्ट आहेत. प्रथिने, कॅल्शियम आणि फायबरनेयुक्त डाळी, कडधान्यांचे सेवन केल्याने वजन आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया अशा ३ डाळींबद्दल ज्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी मूग डाळ सर्वोत्तम मानली जाते. मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फॉस्फरस, फोलेट, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, नियासिन आणि थायामिन सारखे पोषक घटक असतात. मूग डाळीमध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे व्यक्तीला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
मसूर डाळ एका सर्व्हिंगमध्ये फायबरच्या रोजच्या गरजेपैकी ३२ टक्के भाग पुरवते. ही डाळी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि मधुमेहासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. याशिवाय ही मसूर पोटॅशियम, फोलेट आणि लोहाचाही चांगला स्रोत आहे
छोले याला काबुली चणा असेही म्हणतात. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. हे सर्व पोषक पचन निरोगी आणि मजबूत बनवून आणि हाडे मजबूत करून वजन कमी करण्यास मदत करतात. फायबर युक्त छोले खाल्ल्याने व्यक्तीला भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी त्यांच्या आहारात दररोज ३० ग्रॅम कडधान्यांचे सेवन केले पाहिजे. तर शाकाहारी लोकांनी दररोज किमान ६० ग्रॅम डाळींचे सेवन केले पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)