Weight Loss Tips: पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी वाढलीय? 'या' घरगुती उपायाने १० दिवसांत दिसेल फरक-weight loss tips home remedies to reduce belly thighs and waist fat ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी वाढलीय? 'या' घरगुती उपायाने १० दिवसांत दिसेल फरक

Weight Loss Tips: पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी वाढलीय? 'या' घरगुती उपायाने १० दिवसांत दिसेल फरक

Aug 15, 2024 08:24 AM IST

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी लोक विविध मार्ग अवलंबतात. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक लोक असे आहेत जे वजन कमी करण्यासाठी जिममध्ये भरमसाठ फी भरतात, खूप घाम गाळतात. पण तरीही त्यांचे वजन कमी होत नाही.

पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Weight Loss Tips: सध्याच्या काळात लठ्ठपणा ही समस्या फारच वाढत आहे. १० मधील ८ लोकांना तरी हा त्रास आहेच आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात विविध बदल होऊन वजन वाढण्याची समस्यादेखील वाढली आहे. अशातच वजन कमी करण्यासाठी लोक विविध मार्ग अवलंबतात. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक लोक असे आहेत जे वजन कमी करण्यासाठी जिममध्ये भरमसाठ फी भरतात, खूप घाम गाळतात. पण तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. जर तुम्ही पैसे खर्च करून आणि जिममध्ये घाम गाळून थकला असाल, तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. असे केल्यास तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो.

खासकरून बहुतांश लोक पोट, कंबर आणि मांड्यांवरील वाढत्या चरबीमुळे त्रस्त असतात. विशेषकरून महिलांना हा त्रास जास्त असतो. साहजिकच या भागांमध्ये जमा झालेली चरबी सहजासहजी कमी होत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, या भागांमध्ये जमा झालेली चरबी खूप हळूहळू कमी होते. परंतु सर्व महागडे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम करूनही तुमची चरबी कमी होत नसेल, तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमधील काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.

भरपूर पाणी पिणे-

वजन कमी करताना पाणी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. पाण्यामुळे वजन कमी व्हायला विशेष मदत मिळते. शारीरिक यंत्रणा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच दररोज सुमारे २.५ ते ३.५ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शक्यतो थंड पाणी पिणे टाळा. सामान्य किंवा कोमट पाणी तुम्हाला सडपातळ राहण्यास मदत करेल. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. शिवाय शरीर हायड्रेट राहते. जर तुम्हाला पाणी जास्त प्यायला आवडत नसेल, तर अशावेळी तुम्ही हर्बल आणि ग्रीन टीचा पर्यायदेखील निवडू शकता.

आहारात कार्ब्स कमी करणे-

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहारात कार्ब्सचे प्रमाण कमी करायला हवे. परंतु कार्ब्स पूर्णपणे सोडू नये. कारण कर्बोदके तुम्हाला ऊर्जा देतात. एका दिवसातील एकूण कॅलरीजपैकी ६५ ते ७० टक्के कॅलरी कर्बोदकांमधुन मिळाल्या पाहिजेत. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीराला चरबी जाळण्यासाठी योग्य ऊर्जा मिळते तेव्हा वजनही कमी होते.

आहारात प्रोटीन आणि फळांचा समावेश-

वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोटीन असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी भाजलेले चिकन किंवा मासे, वाफवलेल्या भाज्यांसोबत खा. शिवाय स्किम्ड मिल्क हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. नाश्त्यामध्ये अंड्याचा पांढरा भागही खाऊ शकता. एकदम जेवण करण्याऐवजी दिवसातून किमान पाच ते सहावेळा थोड्या-थोड्या अंतराने जेवण करा.शिवाय आहारात फळांचा समावेश केल्यास तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. नैसर्गिक साखर तुमच्या शरीरात जाते. आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लोसुद्धा येतो.

चालणे-

तुमच्या दगदगीच्या आयुष्यात वेळ मिळत नसेल तर, वजन कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय आहे. दिवसातून किमान ४५ मिनिटे चालणे फायद्याचे ठरते. सुरुवातीला तुम्ही ३० मिनिटे चालण्यापासून सुरुवात करा. त्यानंतर वेळ वाढवत ४५ मिनिटांपर्यंत आणा. शिवाय तुम्ही स्क्रन्चेसही काहीवेळा करू शकता. यासोबतच पुरेशी झोप घ्या, ताणतणापासून दूर राहा. याच्या साहाय्याने अवघ्या १० दिवसांत तुम्हाला अपेक्षित फरक दिसून येईल.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )