मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक?

Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक?

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 02, 2024 08:45 PM IST

Weight Loss Tips: तुमच्या दैनंदिन सवयी देखील आरोग्याचा आधार असतात. बहुतेक लोक नकळत काही चुका करतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी

Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक?
Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक? (unsplash)

Mistakes That Can Increase Weight: अनेक वेळा लोक तेलकट आणि जंक फूडपासून दूर राहतात पण तरीही त्यांचे वजन झपाट्याने वाढते. आजकाल लोक अनेकदा या गोष्टीबद्दल तक्रार करतात. सतत वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. लोक अनेकदा नकळत काही चुका करतात ज्यामुळे वजन वाढते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे वजन सतत वाढत असते.

ट्रेंडिंग न्यूज

या सवयींमुळे वाढते वजन

जेवण सोडणे

जर तुम्ही दिवसभर जेवण स्किप केलं तर तुम्ही नंतर अधिक खाण्याकडे कल वाढवू शकतो. याशिवाय ते तुमची चयापचय मंद करू शकते आणि स्नायूंच्या वाढीस प्रतिबंध करू शकते. निरोगी राहण्यासाठी आणि वजन राखण्यासाठी दिवसभर नियमित, संतुलित आहार घेण्याचे लक्ष्य ठेवा.

पोर्शन साइजकडे दुर्लक्ष करणे

अगदी हेल्दी खाण्यातही कॅलरीज असू शकतात. अशा परिस्थितीत लहान प्लेट्स वापरा. पोर्शन साइज तपासा ड्रिंक्स - स्नॅक्समध्ये लपलेल्या कॅलरीज लक्षात ठेवा.

फक्त कार्डिओवर लक्ष केंद्रित करा

स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू तयार होण्यास मदत होते. जे आराम करताना जास्त कॅलरीज बर्न करते. सर्वोत्तम परिणामांसाठी दर आठवड्याला २-३ स्ट्रेंथ ट्रेनिंग सेशनसह कार्डिओ करा.

झोपेकडे दुर्लक्ष करणे

जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचे शरीर जास्त स्ट्रेस हार्मोन तयार करू शकते जे वजन कमी करण्यास अडथळा आणतात. दररोज रात्री ७-८ तास गुणवत्तापूर्ण झोपेची खात्री करा.

गोड ड्रिंक्स

फळांचे रस आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु सोडा आणि ज्यूससारखे गोड रस टाळा. त्यात कॅलरीज असतात, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. त्याऐवजी पाणी, साखर नसलेला चहा/ कॉफी किंवा ताक निवडा.

इमोशनल इटिंग

तणाव, कंटाळा किंवा दुःखामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी होऊ शकतात. तुमचे ट्रिगर ओळखा आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग