Effective Yoga For Weight loss: वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही जिममध्ये खूप घाम गाळता. व्यायामाव्यतिरिक्त डाएटसुद्धा करता. मात्र, वजन कमी करण्यासाठी अन्न सोडायची नव्हे तर संतुलित आहार घेण्याची आवश्यकता असते. पण ज्यांना माहिती नसते, ते त्यांच्या आवडीचे पदार्थ खाणेही सोडून देतात. असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असता. मात्र बऱ्याचदा या सगळ्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. व्यायाम करण्यापेक्षा किंवा योग्य सूचनांशिवाय स्वतःचा आहार ठरवण्यापेक्षा नैसर्गिकरित्या वजन कमी करणे कधीही चांगले.
यासाठी योग हा सर्वात प्रभावी उपाय आहे. योगामुळे प्रत्येक आजार नैसर्गिक पद्धतीने बरा होऊ शकतो. नियमित योगासने करून तुम्ही वजन कमी करू शकता. लवकरच दिवाळीचा सण येणार आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला आपण सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी अनेकजण वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. दिवाळीला आपल्या आवडीचे कपडे परिधान करण्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. आज आम्ही तुम्हाला अशी ३ योगासने सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही सहजपणे आपले वजन कमी करू शकता.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी कुंभकासन सर्वोत्तम आहे. हा एक प्रकारचा प्लँक पोज आहे. जो दररोज केला तर पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीर सुदृढ राहते आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो.
हा योगा प्रकार करण्यासाठी
- जमिनीवर तोंड करून झोपा.
- तुमचे शरीर आणि हातापायाची बोटे वर उचला.
-समोर किंवा खाली चेहरा करा. तुम्हाला जास्त आरामदायक काय आहे हे जाणून तोंडाची स्थिती ठेवा.
- जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत या स्थितीमध्ये राहा आणि नंतर हळूहळू सामान्य स्थितीत परत या.
उष्ट्रासन हे एक उत्कृष्ट योगासन आहे. हे एक असे आसन आहे जी तुमची छाती आणि पाठ उघडण्यास मदत करते. शिवाय अतिरिक्त चरबी कमी होते. विशेष म्हणजे मुलांना उंची वाढवण्यास मदत करते.
हे योगासन करण्यासाठी
- सर्वप्रथम गुडघ्यावर सरळ बसा आणि मांड्या सरळ करा.
- आपले हात आपल्या नितंबांवर ठेवा, पाठीचा थोडासा कमान बनवून मागे वाकवा.
- या दरम्यान, आपले नितंब पुढे ढकला.
- कोणत्याही दबावाशिवाय आपले डोके आणि पाठीचा कणा हळूहळू मागे वाकवा.
- अशाच स्थितीत काहीवेळ राहून आराम करा.
पोटाची पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि मांड्या, छाती, मान आणि खांद्यांची ताकद वाढवून चरबी कमी करण्यासाठी हे आसन आवश्यक आहे. या आसनामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास चांगली मदत होते.
हे योगासन करण्यासाठी
- जमिनीकडे तोंड करून झोपा.
- आपले पाय वरच्या दिशेने पसरवा. मग आपले गुडघे वाकवा आणि आपले पाय आपल्या हातांनी धरा.
- श्वास घ्या आणि आपली छाती शक्य तितकी उंच करा.
- आता त्याला स्ट्रेच करून धनुष्याचा आकार बनवा. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत या स्थितीत रहा आणि नंतर सोडा.