Weight Loss Tea: वजन घटवण्यासाठी चहाचे हे ४ प्रकार आहेत अत्यंत फायदेशीर! वेगाने कमी होते चरबी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tea: वजन घटवण्यासाठी चहाचे हे ४ प्रकार आहेत अत्यंत फायदेशीर! वेगाने कमी होते चरबी

Weight Loss Tea: वजन घटवण्यासाठी चहाचे हे ४ प्रकार आहेत अत्यंत फायदेशीर! वेगाने कमी होते चरबी

Published Jul 30, 2024 08:40 AM IST

Famous Weight Loss Tea: धावपळीच्या जगात लोकांची जीवनशैलीसुद्धा बदलली आहे. बहुतांश लोक झटपट होणारे पदार्थ खातात, सतत फ्रोजन पदार्थ, फास्टफूड असे पदार्थ खात असतात. शिवाय अपुरी झोप आणि विविध ताणतणाव यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

वजन घटवण्यासाठी चहाचे हे ४ प्रकार
वजन घटवण्यासाठी चहाचे हे ४ प्रकार (Shutterstock)

Famous Weight Loss Tea: सध्याचे जग हे धावपळीचे आहे असे म्हटले जाते. कोणत्याही व्यक्तीला स्वतः कडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नाही. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे-आरोग्याकडेसुद्धा अनेकवेळा दुर्लक्ष होतो. शिवाय धावपळीच्या जगात लोकांची जीवनशैलीसुद्धा बदलली आहे. बहुतांश लोक झटपट होणारे पदार्थ खातात, सतत फ्रोजन पदार्थ, फास्टफूड असे पदार्थ खात असतात. शिवाय अपुरी झोप आणि विविध ताणतणाव यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विविद्वज आजार जडण्यासोबतच लोकांचे वजनसुद्धा वेगाने वाढत आहे. अनेक प्रयत्न करूनसुद्धा वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.

अभ्यासानुसार ज्यांना वजन कमी करायचे आहे ते लोक सर्वात आधी खाणे बंद करतात. आणि नंतर जिम जॉइन करतात. पण तरीही वजन कमी होत नाही, का? वास्तविक, योग्य दिनचर्या न पाळता आल्यामुळे असे घडते. वजन कमी करण्यासाठी, आपण एक दिनचर्या पाळली पाहिजे जी आपण दीर्घकाळ अंमलात आणू शकता. शिवाय वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये हे ४ प्रकारचे चहा पिऊ शकतात. हा चहा वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या चार चहांच्या प्रकारांपैकी एखादा जरी चहा नियमित पिल्यास काहीच दिवसांत फरक दिसून येतो.

ओव्याचा चहा-

आयुर्वेदानुसार ओवा पचनासाठी अत्यंत फायदेशीर समजला जातो. शिवाय वजन कमी करण्यासाठी आणि पोट फुगण्यावरही तुम्ही ओव्याचा चहा बनवू शकता आणि पिऊ शकता. हा चहा बनवण्यासाठी पाण्यात आल्याचा तुकडा टाका, आणि नंतर त्यात एक चमचा ओवा घाला. पाणी उकळल्यानंतर ते गाळून त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. आता हा चहा चांगला एकजीव करून प्या. ओव्याने पचनासंबंधी तक्रारी दूर होतात. खालेल्या अन्नाचे योग्य वेळेत पचन होते. त्यामुळे अतिरिक्त चरबी वाढत नाही. आणि वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.

बडीशेप चहा-

वजन घटवविण्यासाठी बडीशोपसुद्धा अत्यंत लाभदायक समजले जाते. बडीशेपचा चहा बनवण्यासाठी एक कप पाणी उकळून त्यात एक चमचा बडीशेप घाला आणि नंतर ते झाकून ठेवा. सुमारे १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर चहा गाळून घेऊन गरमागरम चहाचा आनंद घ्या. हा चहा पचनक्रिया वाढवण्यासाठी आणि भूक कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. भूक नियंत्रणात राहिल्याने चरबी घटवण्यास मोठा फायदा होतो. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी हा चहा खूप चांगला आहे.

जिऱ्याचा चहा

जीरेसुद्धा अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जिऱ्याचा चहा बनवण्यासाठी दीड कप पाणी घ्या आणि नंतर त्यात एक चमचा जिरे टाका. दीड कप पाणी एक कप होईपर्यंत उकळा. नंतर ते गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. हे एक नैसर्गिक पचनक्रिया बूस्टर आहे. जे अन्नाचे चांगले पचन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास देखील मदत करू शकते. शिवाय शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी घटवण्याससुद्धा मदत करते.

तुळशीचा चहा

तुळशीला जितके धार्मिक महत्व आहे तितकेच औषधीय म्हत्वसुद्धा आहे. तुळशी आरोग्यासाठी विविधप्रकारे फायदेशीर आहे. तुळशीचा चहा शरीरातील अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत करतो. हा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अधिक कॅलरीज बर्न होऊ शकतात. हे पचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हा चहा बनवण्यासाठी तुळशीची काही पाने पाण्यात उकळा. नंतर ते एका कपमध्ये काढून त्यात अर्धा चमचा मध टाकून प्या. हा चहा नियमित सेवन केल्यास काहीच दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner