Weight Loss Secret : गव्हाच्या पिठात मिसळा ‘या’ ५ गोष्टी, झटपट वजन कमी करण्यात ठरतील फायदेशीर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Secret : गव्हाच्या पिठात मिसळा ‘या’ ५ गोष्टी, झटपट वजन कमी करण्यात ठरतील फायदेशीर!

Weight Loss Secret : गव्हाच्या पिठात मिसळा ‘या’ ५ गोष्टी, झटपट वजन कमी करण्यात ठरतील फायदेशीर!

Published Feb 10, 2025 02:44 PM IST

Health Tips For Weight Loss : अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी चपाती अर्थात पोळी कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. मात्र, जर तुम्ही गव्हाच्या पिठात काही गोष्टी मिसळाल तर तुमचं वजन कमी करायला नक्की मदत होईल.

गव्हाच्या पिठात मिसळा ‘या’ ५ गोष्टी, झटपट वजन कमी करण्यात ठरतील फायदेशीर!
गव्हाच्या पिठात मिसळा ‘या’ ५ गोष्टी, झटपट वजन कमी करण्यात ठरतील फायदेशीर! (Shutterstock)

Weight Loss Tips In Marathi : पोळी हा भारतीय जेवणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे तसेच कार्बोहायड्रेट्स असतात. हे सर्व पोषक घटक शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र हल्ली वाढत्या लठ्ठपणामुळे लोक पोळी खाणे टाळू लागले आहेत. त्यांना वाटते की, पोळी कमी खाल्ल्याने त्यांचे वजन कमी होऊ शकते. तर, काही लोकांना असे वाटते की, गव्हाची पोळी खाल्ल्याने वजन वाढते. पण, गव्हाच्या पिठात काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने वजन कमी होण्याबरोबरच आरोग्य संतुलित रखण्यासाही मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या पिठात मिसळून त्यांची पोळी बनवू शकता. या पोळ्या तुमच्या शरीरासाठी फॅट कटरसारखे काम करतील.

नाचणीचे पीठ

पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठात नाचणीचे पीठ मिसळू शकता. नाचणीच्या पिठात फायबर आणि अमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच हे ग्लूटेन फ्री देखील आहे. त्याची पोळी खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि ही पोळी सहज पचते. नाचणीचे पीठ मिसळून बनवलेली पोळी खाल्ल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगाने वाढते.

ओट्सचे पीठ

ओट्सच्या पिठात भरपूर फायबर देखील आढळते. अशावेळी तुम्ही तुमच्या नियमित गव्हाच्या पिठात ओट्सचे पीठ मिसळू शकता. या पिठापासून बनवलेली पोळी खाल्ल्याने वजन कमी होते. याशिवाय ओट्सच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर ठरतात. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

Unknown Facts: मांजर चावली तर काय कराल? डॉक्टरांकडे जाऊन किती इंजेक्शन घ्यावी लागतात? जाणून घ्या

बाजरीचे पीठ

गव्हाचे पीठ अधिक निरोगी करण्यासाठी त्यात बाजरीचे पीठ मिसळणे देखील एक चांगला पर्याय आहे. बाजरीच्या पिठात फायबर आणि प्रथिनांबरोबरच मॅग्नेशियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. बाजरीच्या पिठाची पोळी खाल्ल्याने पोट लवकर भरते, जेणेकरून जास्त खाणे टाळता येते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

ज्वारीचे पीठ 

ज्वारी देखील ग्लूटेन-फ्री पीठ आहे, ज्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्याबरोबरच हृदयाशी संबंधित समस्याही दूर होतात. यासोबतच खराब पचनक्रियाही सुधारते. आपण आपल्या नियमित गव्हाच्या पिठात ज्वारीचे पीठ मिसळून निरोगी आणि चवदार पोळी सहज तयार करू शकता.

मक्याचे पीठ

मक्याच्या पिठात गव्हापेक्षा खूपच कमी कॅलरी असतात. यासोबतच हे ग्लूटेन फ्री देखील आहे. मक्याच्या पिठात प्रथिने, लोह, फॉस्फरस, झिंक आणि अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. यासोबतच डोळ्यांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. गव्हाच्या पिठात हे पीठ मिसळून तुम्ही पोळी किंवा पराठे तयार करू शकता.

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner