Does tomato soup lose weight: अलीकडे लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. त्यामुळेच लोक वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. काही लोक व्यायाम आणि योग्य डाएटच्या आधाराने वजन कमी करण्यात यशस्वी होतात. तर काही लोक चक्क उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु २..३ दिवसांतच त्यांचा हा निश्चय तुटतो. त्यामुळेच बहुतांश लोकांसाठी वजन कमी करताना, पौष्टिक आणि समाधानकारक अन्न यांच्यातील योग्य संतुलन शोधणे हे एक आव्हान असू शकते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करतांनाही पोटभर खाता येणारी चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. वजन कमी करताना तुमच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक म्हणजे टोमॅटो सूप होय.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लीमेन्ट्री गुणधर्मांनी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच हे सूप अत्यंत उपयुक्त आहे. हे स्वादिष्ट सूप केवळ संपूर्ण आरोग्यालाच प्रोत्साहन देत नाही तर वजन कमी करण्यासही मदत करते. टोमॅटो सूप हे पचनास हलके पण पौष्टिक असते. त्यामुळेच तुम्हाला दिवसभर उत्साही आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
-४ मोठे पिकलेले टोमॅटो
-१ मध्यम आकाराचा कांदा, चिरलेला
-२ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
-२ इंच ताजे आले, किसलेले
-१ टीस्पून हळद पावडर
-१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
-३ कप मिक्स भाज्याचे अर्क
-चवीनुसार मीठ
- मिरपूड गरजेनुसार
-गार्निशसाठी ताजी कोथिंबीर
-१ टीस्पून लिंबाचा रस (पर्यायी)
- टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ऑलिव्ह ऑईल मध्यम आचेवर गरम करा. त्यात चिरलेला कांदा घाला आणि हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- नंतर त्यात लसूण आणि आले घाला, सुगंधी होईपर्यंत आणखी एक मिनिट शिजवा.
- आता त्यात हळद घाला, नंतर चिरलेला टोमॅटो घाला. पुन्हा ५ मिनिटे टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजवा.
-आता त्यामध्ये भाजीचा रस्सा अर्थातच शिजवलेला अर्क घालून मिश्रण मंद आचेवर १५ ते २० मिनिटे चांगले शिजवा.
- नंतर ब्लेंडर किंवा मिक्सर वापरून, सूप एकदम मऊ गुळगुळीत होईपर्यंत प्युरी करा.आता सूप किंचित थंड होऊ द्या, ते पुन्हा ब्लेंडरमध्ये घाला आणि गुळगुळीत होईपर्यंत फिरवा.
-मिस्करमधून काढून पुन्हा थोडावेळ शिजवा. आता इच्छित असल्यास मीठ, मिरपूड आणि लिंबाचा रस घाला. आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे चविष्ट टोमॅटो सूप.