Weight Loss Mistakes: डायटिंग करूनही वजन कमी होत नाही? ही आहेत मोठी कारणं
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Mistakes: डायटिंग करूनही वजन कमी होत नाही? ही आहेत मोठी कारणं

Weight Loss Mistakes: डायटिंग करूनही वजन कमी होत नाही? ही आहेत मोठी कारणं

Apr 17, 2023 06:07 PM IST

Weight Loss Tips: अनेक वेळा लोक बरेच दिवस डाएटिंग करतात. असे असूनही लठ्ठपणाची समस्या तशीच असते. यामागे काय कारण आहे माहीत आहे का? चला जाणून घ्या.

वजन कमी न होण्याची कारणं
वजन कमी न होण्याची कारणं

Reasons of Not Losing Weight: आज लठ्ठपणा ही प्रत्येक व्यक्तीसाठी समस्या बनली आहे. अति लठ्ठपणा केवळ तुमचे व्यक्तिमत्व बिघडवत नाही तर इतर अनेक मोठ्या आजारांना आमंत्रण देतो. हे टाळण्यासाठी अनेक वेळा लोक बरेच दिवस डाएटिंग करत असतात. असे असूनही लठ्ठपणाची समस्या तशीच असते. यामागे काय कारण आहे माहीत आहे का? शेवटी कमी खाल्ल्यानंतरही बरेच लोक वजन का कमी करू शकत नाहीत? याचे योग्य उत्तर जाणून घेऊया.

Summer Care Tips: उन्हाळ्यात हेल्दी राहण्यासाठी खा 'या' गोष्टी, शरीर राहील आनंदी आणि कूल

कमी खाऊनही वजन का कमी होत नाही?

झोपेचे पॅटर्न

हेल्दी खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकत नसाल, तर तुमच्या झोपेचा पॅटर्नही त्यासाठी जबाबदार असू शकतो. होय, तुम्ही ९ तासांपेक्षा जास्त आणि ५ तासांपेक्षा कमी झोपले तरीही तुमचे वजन वाढू शकते. झोपण्याच्या या पद्धतीचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जास्त भूक लागते आणि तो लठ्ठपणाचा शिकार होऊ शकतो.

कमी पाणी पिणे

आजकाल लोक तहान लागल्यावर पाण्यापेक्षा सोडा ड्रिंक, ज्यूस, कॉफी यासारख्या गोष्टी अधिक पिण्यास प्राधान्य देतात. अशा पेयांमध्ये साखरेची पातळी खूप जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा टाळायचा असेल तर तहान लागल्यावर जास्तीत जास्त पाणी प्या. पाण्यामध्ये कॅलरीज नसतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास प्रतिबंध होते.

Weight Loss साठी सकाळी करा हे काम, वजन कमी होण्यासोबत मनही राहील शांत

जास्त वेळ उपाशी राहणे

अनेक वेळा लोकांना असे वाटते की त्यांनी कमी खाल्ले किंवा जास्त वेळ उपाशी राहिल्यास त्यांचे वजन लवकर कमी होईल. पण तसे अजिबात नाही. जास्त वेळ उपाशी राहिल्याने व्यक्तीचे वजन कमी होत नाही तर वाढते. असे घडते कारण दीर्घकाळ काहीही न खाल्ल्याने चयापचय क्षमता कमी होते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज नष्ट होत नाहीत. या कॅलरीजमुळे वजन वाढते.

जास्त वेळ बसणे

ऑफिसमध्ये कामाच्या प्रेशरमुळे किंवा तुमचा आवडता टीव्ही कार्यक्रम पाहत तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहता. तुमच्या या सवयीमुळे तुमचे वजन वाढू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका जागी जास्त वेळ बसल्याने शरीराची भूक नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते आणि लोक गरजेपेक्षा जास्त खातात. त्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढू लागतो.

तणाव किंवा थायरॉईड

ज्या लोकांना थायरॉईडचा आजार आहे किंवा जास्त ताण वाटतो त्यांनाही लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. वास्तविक, थायरॉईडमधील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजन वाढण्याची समस्याही सतावू लागते. याशिवाय जे लोक तणाव घेतात त्यांना जास्त भूक लागते. अशा स्थितीत भूक भागवण्यासाठी ते घाईघाईत जास्त कॅलरी असलेले स्नॅक्स घेतात, ज्यामुळे वजन वाढते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner