Healthy eating for weight loss: आजच्या काळात लठ्ठपणा ही जवळपास सर्वच लोकांची मोठी समस्या बनली आहे. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग अवलंबतात. विविध प्रकारचे आहार घेण्यापासून ते जिममध्ये तासंतास घामही गाळतात. पण तरीही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात निराशा निर्माण होते. अशावेळी अनेक लोक सर्वच प्रयत्न सोडून देतात. कदाचित तुमच्यासोबतही असं झालं असेल. परंतु यामागे विविध कारणे असू शकतात. ज्याचा सर्वसामान्य लोक कधी विचारही करत नाहीत. त्यातीलच एक म्हणजे जेवण बनवण्याची पद्धत होय. तुम्ही तुमचे अन्न कसे शिजवता याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का?
वास्तविक तुम्ही वजन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर पाहून किंवा इतरांना विचारून काही रेसिपी फॉलो करता. पण त्यात तुमच्या वजनानुसार किती तूप किंवा तेल घालायचे यावर फारसे लक्ष केंद्रित करत नाही. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात अडचण येते. त्यामुळे वेट लॉसचे पदार्थ खाऊनसुद्धा तुमचे वजन कमी होण्यास अडचण येतात. त्यामुळेच आज आम्ही या लेखात तुम्हाला स्वयंपाकाच्या काही टिप्स सांगत आहोत जे वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील. शिवाय या टिप्स तुम्ही तुमच्या जीवनशैलीत समाविष्ट केल्यास वजन वाढण्याची समस्याच दूर होईल.
आहार तज्ज्ञांच्या मते, तुम्ही स्वयंपाक करत असताना, काही पदार्थ तळण्याऐवजी वाफाळणे किंवा ग्रिलिंगसारखे पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, केवळ पोषक द्रव्ये त्यात टिकून राहात नाहीत, तर तळलेल्या वस्तूंमधून शरीरात वाढणारी अतिरिक्त कॅलरी आणि चरबीदेखील टाळता येते. त्यामुळे वजन कमी करताना स्टीमिंग आणि ग्रिलिंग पर्याय सर्वोत्तम मानले जातात. तळण्यासाठी एअर फ्रायर वगैरे वापरता येते.
वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे आहारात पालेभाज्यांचा जास्तीत-जास्त समावेश होय. जेव्हा तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या जेवणात जास्तीत जास्त भाज्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे तुम्हाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. दिवसातील प्रत्येक जेवणात यांचा समावेश केल्याने, तुमच्या एकूण कॅलरीजचा वापर कमी होण्यास मदत होते.
अलीकडच्या काळात सर्वसाधारणपणे लोक, स्वयंपाक करताना जेवण चवदार बनवण्यासाठी विविध प्रकारचे सॉस वापरतात. पण जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचे असेल, तर सॉसऐवजी औषधीय गुणधर्मयुक्त मसाले आणि औषधी वनस्पती वापरा. मसाले आणि औषधी वनस्पती आपल्या अन्नाला उत्कृष्ट सुगंध आणि चव देतात. शिवाय त्यात कोणत्याही कॅलरी नसतात. दुसरीकडे, सॉसमध्ये अनेकदा साखर आणि फॅट्स असतात.