Weight Loss Drink: दररोज उपाशी पोटी प्या 'हे' ड्रिंक, वेगाने वितळेल चरबी, व्हाल सडपातळ
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Drink: दररोज उपाशी पोटी प्या 'हे' ड्रिंक, वेगाने वितळेल चरबी, व्हाल सडपातळ

Weight Loss Drink: दररोज उपाशी पोटी प्या 'हे' ड्रिंक, वेगाने वितळेल चरबी, व्हाल सडपातळ

Dec 19, 2024 09:50 AM IST

Drink For Weight Loss: लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास ते अनेक गंभीर आजारांना जन्म देते. अशा परिस्थितीत काही हेल्दी ड्रिंक्स आहेत, जे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने सहज कमी होऊ शकते.

Does Fennel Water Help In Weight Loss
Does Fennel Water Help In Weight Loss (FREEPIK)

Weight Loss Drink In Marathi:  खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. लोक पौष्टिक अन्न खाण्याऐवजी जंक फूड आणि फास्ट फूडचे सेवन करू लागले आहेत. लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास ते अनेक गंभीर आजारांना जन्म देते. अशा परिस्थितीत काही हेल्दी ड्रिंक्स आहेत, जे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने सहज कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत ही खास पेये कोणती आहेत हे जाणून घेऊया.

रोज प्या बडीशेपचे पाणी-

लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज बडीशेपचे पाणी प्यावे. यासाठी एका ग्लासमध्ये दोन चमचे बडीशेप टाकून ती शिजवावी लागेल. अर्धे पाणी उरले की ते गाळून चहासारखे प्या. यामुळे लठ्ठपणासोबत पचनाच्या समस्याही दूर होतात.

रिकाम्या पोटी प्या ओव्याचे पाणी-

सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास लठ्ठपणा दूर होण्यास तसेच पचनास मदत होते. ते प्यायल्याने चयापचय वाढतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

आवळा पाणी-

वजन कमी करण्यासाठी आवळा पाणी हे उत्तम साधन आहे. त्यात काळी मिरी आणि काळे मीठ मिसळून वजन कमी करण्यासाठी खूप गुणकारी ठरते.

आले, मध आणि लिंबू स्पेशल चहा-

जर तुम्ही दररोज आले, मध आणि लिंबाचा स्पेशल चहा प्यालात, त्यामुळे ते शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यात आले उकळून त्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालावे लागेल.

आले आणि पुदिन्याचे पाणी-

लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी आले आणि पुदिन्याचे पाणी प्यावे. यासाठी तुम्हाला ४ ते ५ पुदिन्याची पाने आणि आल्याचा तुकडा एका ग्लास पाण्यात काही काळ भिजवावा लागेल.हे पाणी पिल्याने वाढलेली चरबी वेगाने वितळते.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Whats_app_banner