मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips : केवळ पाणी प्यायल्यानं कमी होतोय लठ्ठपणा?, वाचा घरगुती टिप्स
Weight Loss And Water
Weight Loss And Water (HT)
14 May 2022, 9:00 AM ISTAtik Sikandar Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 9:00 AM IST
  • अनेक लोकांना अतिरिक्त वजनवाढीचा किंवा लठ्ठपणाचा त्रास होत असतो. परंतु तुम्हाला विश्वास बसणार नाही आता फक्त पाण्याचं सेवन केल्यानं तुम्हाला लठ्ठपणावर मात करता येणार आहे.

Weight Loss : सध्याच्या काळात अनेक लोकांना असंतुलित आहारामुळं आणि बदलत्या जीवनशैलीमुळं लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. अनेक लोकांच्या आरोग्यासाठी ही मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेस राखण्यासाठी लोकांना फार कसरत करावी लागते, परंतु वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी पाणी पिणं हा उत्तम आणि गुणकारी उपाय मानला जातो. त्यामुळं स्त्रियांनी आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी नेमकं किती प्रमाणात पाणी प्यायला हवं, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

लठ्ठपणाचा त्रास कमी करण्यासाठी अनेकजण हे विविध पद्धतींचा उपचार करत असतात. अनेकजण या समस्येवर मात करण्यासाठी खाणं कमी करतात तर काही लोक डाएट करणं पसंत करतात, परंतु आता तुम्हालाही लठ्ठपणाचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला या पद्धती अवलंबण्याची आवश्यकता नाही. कारण फक्त पाण्याचं सेवन करुन तुम्ही वजनवाढीच्या समस्येवर मात करू शकता.

काय आहेत फायदे?

सातत्यानं आवश्यक प्रमाणात पाण्याचं सेवन केल्यास त्यामुळं अन्नपचन होण्यास मदत होत असते, याशिवाय त्यामुळं शरीरातील उर्जा कायम राहते. परिणामी व्यक्तीचं वजन कमी व्हायला लागतं. त्यासाठी महिलांना दिवसातून कमीत कमी तीन लिटर तर पुरुषांनी कमीत कमी २ लिटर पाणी दररोज प्यायला हवं. याशिवाय व्यक्तीनं विविध अन्नपदार्थ खाण्यापूर्वी पाणी पिलं तर त्यामुळं शरीरातील कॅलरीजचं प्रमाण हे कमी होत जातं. त्यामुळं शरीरातील फॅटचं प्रमाण कमी होतं. याशिवाय जेवणाआधी पाण्याचं सेवन केल्यास त्यामुळं भूक लागत नाही परिणामी व्यक्तीचं वजन कमी होतं. त्यामुळं जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असेल तर त्यासाठी दिवसभरात वेळोवेळी पाणी पित राहण्याची आवश्यकता आहे.

काय आहेत स्टेप्स?

वजन कमी करण्यासाठी लहके आणि कोमट पाणी अत्यंत गुणकारी मानलं जातं. कारण कोमट पाण्याचं सेवन केल्यास त्यामुळं अन्नपदार्थ लवकर पचण्यास मदत होते. त्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. लठ्ठपणाच्या समस्येशिवाय तुम्हाला लघवी करताना त्यात पिवळा रंग येत असेल तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असण्याची शक्यता असते. अशा वेळी दिवसातून आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात पाण्याचं सेवन करायला हवं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग