मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chicken Tahari: वीकेंड बनवायचा असेल खास तर ट्राय करा हैद्राबादी चिकन ताहारीची ही रेसिपी

Chicken Tahari: वीकेंड बनवायचा असेल खास तर ट्राय करा हैद्राबादी चिकन ताहारीची ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 19, 2024 11:05 PM IST

Weekend Special Recipe: वीकेंडला काहीतरी वेगळी डिश ट्राय करायची असेल तर तुम्ही हैद्राबादी चिकन ताहारी बनवू शकता. नॉनव्हेज लव्हर्सला नक्की आवडेल ही रेसिपी.

हैद्राबादी चिकन ताहारी
हैद्राबादी चिकन ताहारी (freepik)

Hydrabadi Chicken Tahari Recipe: सुट्टीचा दिवस म्हटला की नॉनव्हेज प्रेमी चिकन, मटनचे विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. नेहमीचे चिकन करी किंवा बटर चिकन खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हैद्राबादी चिकन ताहारी बनवा. हे तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात बनवू शकता. या खास डिशने तुम्ही तुमचा वीकेंड आणखी खास बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे हैद्राबादी चिकन ताहारीची रेसिपी.

हैद्राबादी चिकन ताहारी बनवण्यासाठी साहित्य

- अर्धा किलो चिकन

- २ कप भिजवलेला बासमती तांदूळ

- १ कांदा

- १ मोठा चिरलेला टोमॅटो

- दीड चमचे चिरलेला लसूण

- १ टेबलस्पून आले चिरलेले

- ३ हिरव्या मिरच्या

- ६ चिरलेली पुदिन्याची पाने

- ५ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

- १ काळी वेलची

- १ दालचिनीची काडी

- १ टीस्पून हळद

- दीड टेबलस्पून गरम मसाला

- ६ टेबलस्पून तेल

- मीठ चवीनुसार

हैद्राबादी चिकन ताहारी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम तांदूळ धुवून थोडा वेळ भिजवा. नंतर आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची बारीक पेस्ट बनवा. आता जाड तळाच्या भांड्यात तेल गरम करा. नंतर त्यात दालचिनी, लवंग आणि वेलची घाला. मसाल्यांना सुगंध यायला लागल्यावर त्यात कांदे टाका. तपकिरी होईपर्यंत नीट भाजून घ्या. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो, हळद आणि तयार केलेली पुदिना कोथिंबीरची पेस्ट घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि मसाल्यातून तेल सुटेपर्यंत शिजवा. आता गरम मसाला आणि चिकनचे तुकडे घाला. चिकनला मसाला नीट कोट होईपर्यंत मिक्स करा. आता त्यात चवीनुसार मीठ घाला आणि अर्धा कप पाणी घाला. चिकन मऊ होईपर्यंत नीट शिजवा. आता भिजवलेल्या तांदूळ घाला आणि ४ कप पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करा. याला उकळी आणा. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा आणि १० ते १५ मिनिटे झाकण बंद राहू द्या. तुमचे हैद्राबादी चिकन ताहारी तयार आहे.

WhatsApp channel