Chilli Chicken Recipe: वीकेंड बनवा सुपर टेस्टी हनी चिली चिकनसोबत, नोट करा ही स्पेशल चायनीज रेसिपी-weekend special recipe how to make honey chilli chicken recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chilli Chicken Recipe: वीकेंड बनवा सुपर टेस्टी हनी चिली चिकनसोबत, नोट करा ही स्पेशल चायनीज रेसिपी

Chilli Chicken Recipe: वीकेंड बनवा सुपर टेस्टी हनी चिली चिकनसोबत, नोट करा ही स्पेशल चायनीज रेसिपी

Mar 10, 2024 12:11 PM IST

Weekend Special Recipe: जर तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडत असेल तर तुम्ही हनी चिली चिकनची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुमचा वीकेंड आणखी खास करेल.

हनी चिली चिकन
हनी चिली चिकन (freepik)

Honey Chilli Chicken Recipe: बदलत्या काळामुळे व्यक्तीच्या ड्रेसिंगवरच नव्हेतर त्याच्या खाण्याच्या सवयींवरही परिणाम होतो. आजकाल लोक वीकेंडला नेहमीचे वरण, भात, भाजी पोळी खाण्याऐवजी चायनीज, मेक्सिकन फूड चाखणे जास्त पसंत करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नॉनव्हेज लव्हर असाल तर तुम्ही हनी चिली चिकनची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी घरी बनवायला सोपी आहे आणि ती तुमच्या सुट्टीचा आनंद सुद्धा वाढवेल. चला तर मग जाणून घ्या वीकेंडसाठी स्पेशल चायनीज रेसिपी बनी चिली चिकन कसे बनवावे.

हनी चिली चिकन बनवण्यासाठी साहित्य

- चिकन - ५०० ग्रॅम (ब्रेस्ट पीस)

- १ अंड्याचा पांढरा भाग

- चवीनुसार मीठ

- पांढरी मिरची पावडर - १/२ टीस्पून

- हिरव्या मिरचीची चटणी - १ टेबलस्पून

- मैदा - १/४ कप

- कॉर्न फ्लोअर - १/४ कप

- ऑलस्पाईस पावडर - १/२ टीस्पून

- आले लसूण पावडर - १ टीस्पून

- बेकिंग पावडर - १/२ टीस्पून

हनी चिली सॉस बनवण्यासाठी साहित्य

- बटर - १ टेबलस्पून

- तीळाचे तेल - २ टेबलस्पून

- लसूण बारीक चिरलेले - १ टेबलस्पून

- हिरवा कांदा - २ टेबलस्पून

- टोमॅटो केचप - २ टेबलस्पून

- तीळ - १ टीस्पून

- सोया सॉस - १ टेबलस्पून

- रेड चिली सॉस - १ टीस्पून

- मध - २ चमचे

- मीठ - १/२ टीस्पून

हनी चिली चिकन कसे बनवायचे

हनी चिली चिकन बनवण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे टाका आणि त्यात मीठ, पांढरी मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट किंवा ग्रीन चिली सॉस, मैदा, कॉर्न फ्लोअर, अंड्याचा पांढरा भाग, आले-लसूण पावडर टाका. आता हे सर्व मिक्स करा. सुगंधी पावडर आणि बेकिंग पावडर सारखे घटक चिकनसोबत चांगले मिक्स करा. आता हे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

आता हनी चिली सॉस बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर, तिळाचे तेल, हिरवा कांदा, चिरलेला लसूण, टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिली सॉस, मध, मीठ, तीळ टाकून मिक्स करा. आता त्यात तळलेले चिकनचे तुकडे घालून सर्व चांगले भाजून ग्या. चिकनचे तुकडे या सॉसमध्ये चांगले कोट होतील याची काळजी घ्या. तुमचे हनी चिली चिकन तयार आहे. चिरलेला हिरवा कांदा आणि तीळाने गार्निश करा आणि सर्व्ह करा.

विभाग