मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Recipe: बेसन आणि रव्यापासून बनवा टेस्टी व्हेज टिक्का, वीकेंड खास बनवेल ही रेसिपी

Breakfast Recipe: बेसन आणि रव्यापासून बनवा टेस्टी व्हेज टिक्का, वीकेंड खास बनवेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 24, 2024 08:41 AM IST

Weekend Special Recipe: वीकेंडला काहीतरी स्पेशल नाश्ता करायचा असेल तर तुम्ही व्हेज टिक्कीची ही रेसिपी ट्राय करू शकता. भरपूर भाज्या असलेली ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल.

व्हेज टिक्का
व्हेज टिक्का (freepik)

Veg Tikka Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी अनेकदा काही टेस्टी आणि हेल्दी पर्याय आवश्यक असतो. तेलात तळलेले आणि अनहेल्दी फूड आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर तुम्हाला भाज्यांचा वापर करून काही हेल्दी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही व्हेज टिक्का पटकन तयार करू शकता. बेसन आणि रवा मिक्स करून हे व्हेज टिक्का बनवता येते. यात तुम्ही भरपूर भाज्या टाकू शकता. मुलं ज्या भाज्या खाण्याचा कंटाळा करत असतील त्या भाज्या ते सहज खातील. ही रेसिपी बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे व्हजे टिक्का

व्हेज टिक्का बनवण्यासाठी साहित्य 

- ३/४ कप बेसन

- १/४ कप रवा

- दही

- फ्लॉवर बारीक चिरलेला

- टोमॅटो बारीक चिरलेला

- कांदा बारीक चिरलेला

- आले-लसूण पेस्ट

- ५ हिरव्या मिरच्या

- कोथिंबीर

- १/२ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून जिरेपूड

- १/४ हळद

- धने पावडर

- ठेचलेली लाल मिरची

- १/२ टीस्पून चाट मसाला

- १ चमचा ओवा

- २ चमचे तेल

- दोन ते दोन अडीच कप पाणी

- चिमूटभर हिंग

- चवीनुसार मीठ

व्हेज टिक्का बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या. त्यात रवा आणि दही मिक्स करा. तसेच लाल तिखट, जिरे, धणे पूड घाला. मीठ आणि हळद एकत्र मिक्स करा. आता त्यात ठेचलेली लाल मिरची आणि चाट मसाला घाला. बारीक चिरलेल्या भाज्या मिक्स करा. फ्लॉवर, कांदा, टोमॅटो मिक्स करा. तुम्ही यात गाजर, कोबी, सिमला मिरची, हिरवा कांदा सुद्धा टाकू शकता. आता कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला. कढईत तेल गरम करून जिरे तडतडून घ्या. त्यात थोडी मोहरी घाला. हिंग आणि आले लसूण पेस्ट घाला. पेस्टचा कच्चापणा निघून गेल्यावर बेसन आणि रव्याचे मिश्रण घालून ढवळा. ते नीट सुकून घट्ट होईपर्यंत ढवळा. मिश्रण कढईच्या बाजूला सोडू लागले हे मिश्रण एका तेलने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून पसरवा. थंड होऊ द्या. नंतर चौकोनी आकारात कापून पॅनमध्ये भाजून घ्या. तुमचे टेस्टी व्हेज टिक्का तयार आहे.

WhatsApp channel

विभाग