Cheese Grilled Sandwich Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सँडविच खायला आवडते. तुम्ही सुद्धा वीकेंडला नाश्त्याला सँडविच बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चीज ग्रील्ड सँडविचची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी टेस्टी तर आहेच शिवाय बनवायलाही सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या चीज ग्रील्ड सँडविचची रेसिपी.
- ४ स्लाइस ब्रेड
- २ चमचे चीज
- १ टोमॅटो चिरलेला
- १ कांदा चिरलेला
- १/२ टीस्पून काळी मिरी पावडर
- १/२ टीस्पून बटर
- १/२ टीस्पून चाट मसाला
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
चीज ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडवर चीज लावून त्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मीठ घालून नीट पसरवा. त्यावर काळी मिरी पावडर, चाट मसाला शिंपडा. यानंतर, एक ब्रेड दुसऱ्याच्या वर ठेवून, ब्रेडवर हलके बटर लावा. आता सँडविच ग्रील गरम करून त्यावर तयार केलेले सँडविच ठेवा. सँडविच दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ग्रील करा. तुमची टेस्टी चीज ग्रील्ड सँडविच तयार आहे. तुम्ही यात आतून हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावू शकता. किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात सँडविच मसाला सुद्धा टाकू शकता.