Uttapam Recipe: नाश्त्यासाठी भरपूर भाज्या टाकून बनवा उत्तपम, वीकेंडची होईल टेस्टी आणि हेल्दी सुरुवात
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Uttapam Recipe: नाश्त्यासाठी भरपूर भाज्या टाकून बनवा उत्तपम, वीकेंडची होईल टेस्टी आणि हेल्दी सुरुवात

Uttapam Recipe: नाश्त्यासाठी भरपूर भाज्या टाकून बनवा उत्तपम, वीकेंडची होईल टेस्टी आणि हेल्दी सुरुवात

Published Mar 30, 2024 10:42 AM IST

Weekend Special Breakfast Recipe: जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर तुम्ही चविष्ट उत्तपम बनवू शकता. अनेक भाज्या टाकून ते बनवता येते. जाणून घ्या सोपी रेसिपी

व्हेजिटेबल उत्तपम
व्हेजिटेबल उत्तपम (freepik)

Vegetable Uttapam Recipe: सकाळचा नाश्ता टेस्टी आणि हेल्दी असेल तर पूर्ण दिवस चांगला जातो. वीकेंडला नाश्त्यात काहीतरी वेगळे खाण्याचा विचार करत असाल तर उत्तपमची ही रेसिपी ट्राय करा. भरपूर भाज्या टाकून बनवलेला हा उत्तपम खायला टेस्टी आणि हेल्दी देखील आहे. वास्तविक उडीद डाळ आणि तांदूळ घालून उत्तपम बनवले जाते. पण आज आम्ही रव्यापासून बनवलेल्या उत्तपमची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग जाणून घ्या रवा उत्तपमची रेसिपी

व्हेजिटेबल उत्तपम बनवण्यासाठी साहित्य

- रवा - २ कप

- दही - २ कप

- तेल - ४-६ चमचे

- कोथिंबीर बारीक चिरून

- एक लहान टोमॅटो बारीक चिरून

- एक लहान कोबी बारीक चिरलेली

- एक लहान शिमला मिरची बारीक चिरलेली

- हिरवी मिरची बारीक चिरलेली

- आले किसलेले

- मीठ चवीनुसार

- मोहरी अर्धा टीस्पून

व्हेजिटेबल उत्तपम बनवण्याची पद्धत

एका मोठ्या भांड्यात रवा घ्या. नंतर त्यात दही घालून मिक्स करा. जाडसर पीठ तयार करा. नंतर त्या बॅटरमध्ये मीठ, आले, हिरवी मिरची घालून मिक्स करून थोडा वेळ ठेवा म्हणजे पीठ तयार होईल. जर बॅटर खूप घट्ट असेल तर त्यात पाणी घाला आणि नंतर इनो फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करा. उत्तपम बनवण्याचे पीठ तयार आहे. आता सर्व भाज्या घाला आणि मिक्स करा. नंतर गॅसवर नॉन-स्टिक पॅन ठेवा आणि गरम करा. आता हे बॅटर गरम तव्यावर ओता आणि चमच्याने एकसारखे पसरवा. नंतर दोन्ही बाजूंनी शिजवा. जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखे उत्तपम बनवायचे असेल तर भाज्या पीठात घालू नका. तव्यावर बॅटर पसरवा आणि नंतर त्यावर भाज्या पसरवा. दोन्ही बाजूने नीट शिजवा. तुमचा टेस्टी आणि हेल्दी व्हेजिटेबल उत्तपम तयार आहे.

Whats_app_banner