Side Effects of Wearing Socks While Sleeping: हिवाळा सुरू होताच लोक थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालतात. अनेक लोक तक्रार करतात की थंडीमुळे त्यांचे पाय नेहमी थंड राहतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना रात्री नीट झोपही येत नाही. यामुळे पायाचे तळवे उबदार ठेवण्यासाठी ते मोजे घालून झोपतात. अनेक लोकांना रात्री झोपताना मोजे घालायला आवडतात. तुम्हालाही मोजे घालून झोपायची सवय असेल तर ही लगेच सोडा. कारण हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हिवाळ्यात मोजे घालून झोपल्याने आरोग्याला काय नुकसान होतात ते जाणून घ्या.
झोपताना खूप घट्ट मोजे घातल्याने ब्लड सर्कुलेशनवर परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी मोजे काढा किंवा सैल मोजे घाला.
मोजे घातल्याने पायात इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. खरं तर दिवसभर मोजे घातल्याने घाण आणि बॅक्टेरिया त्यांना चिकटतात आणि त्यामुळे पायात फंगल इंफेक्शन होऊ शकतो.
घट्ट मोजे घालून झोपल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे झोपताना मोजे काढले तर बरे होईल. घट्ट सॉक्समुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊन पायाला खाज सुद्धा येऊ शकते. याशिवाय रात्री मोजे घालून झोपल्याने व्यक्तीला अस्वस्थ वाटते आणि त्यामुळे निद्रानाशही होतो.
रात्रभर मोजे घालून झोपल्याने जास्त गरम होऊ शकते. वास्तविक रात्री झोपताना मोजे घातल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. जर तुमचे मोजेमधून हवा पास होत नसेल तर ते जास्त गरम होऊ शकते. त्यामुळे डोक्यात उष्णता निर्माण होऊन अस्वस्थता येते.
घट्ट मोजे घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दाब पडतो आणि हृदयाला रक्त पंप करण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत हृदयाला पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. ज्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)