Weight Loss Mistakes: वेट लॉसशी संबंधित या चुका कमी होऊ देत नाहीत लठ्ठपणा, पाहा पोषणतज्ञांचा सल्ला-we should avoid these weight loss mistakes to get successful results ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Mistakes: वेट लॉसशी संबंधित या चुका कमी होऊ देत नाहीत लठ्ठपणा, पाहा पोषणतज्ञांचा सल्ला

Weight Loss Mistakes: वेट लॉसशी संबंधित या चुका कमी होऊ देत नाहीत लठ्ठपणा, पाहा पोषणतज्ञांचा सल्ला

Feb 24, 2024 09:34 AM IST

Weight Loss Tips: डायट आणि विविध प्रकारचे व्यायाम करूनही वजन किंवा लठ्ठपणा कमी होत नसेल तर यामागे तुमच्या जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असू शकतात. वजन कमी करण्यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे जाणून घ्या.

वजन कमी करण्यासाठी या चुका टाळा
वजन कमी करण्यासाठी या चुका टाळा (unsplash)

Avoid Weight Loss Mistakes: टोन्ड फिट बॉडी व्यक्तीचा आत्मविश्वास तर टिकवून ठेवतेच पण त्याला अनेक मोठ्या आजारांच्या जोखमीपासून दूर ठेवण्यास मदत करते. आजकाल वाढते वजन ही बहुतेक लोकांसाठी मोठी समस्या बनली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी ते डाएटिंग किंवा तासन्तास जिम आणि योगासने करतात. असे असूनही अनेक वेळा लठ्ठपणाची समस्या तशीच राहते. डायट आणि विविध प्रकारचे व्यायाम करूनही वजन किंवा लठ्ठपणा कमी होत नाही. यामागे तुमच्या जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असू शकतात. अनेक वेळा आपण नकळत अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपले वजन कमी करण्याचा प्रवास मंदावतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही का चुका टाळल्या पाहिजे. कोणत्या त्या पाहा.

प्रथिनांचे अपुरे सेवन

आहारात प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचे आरोग्य तर धोक्यात येतेच पण वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा ते अडथळा ठरू शकते. त्यामुळे व्यक्तीची स्नॅक्स खाण्याची क्रेविंग वाढते. त्यामुळे वजन वाढू लागते.

आरोग्य समस्या

हायपोथायरॉईडीझम, व्हिटॅमिन डी किंवा बी १२ ची कमतरता यासारख्या काही आरोग्य समस्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणू शकतात. अशा परिस्थितीत तुमचे वजन कमी करण्याचे मिशन पूर्ण करण्यासाठी शरीरातील या जीवनसत्त्वांची कमतरता दूर करण्यासाठी रुटीन टेस्ट करून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.

प्रोसेस्ड फूड

प्रक्रिया केलेल्या फूडमध्ये कॅलरीज जास्त असते आणि त्यात पोषक तत्वांचा अभाव असतो. फास्ट फूड, जंक फूड, पॅकबंद वस्तू, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्तीचे वजन वाढते. या पदार्थांमुळे लठ्ठपणा येतो हे बहुतेक लोकांना माहीत असले तरी ते या गोष्टी टाळू शकत नाहीत आणि त्यांचे वजन वाढतच जाते.

पुरेशी झोप न मिळणे

अपुऱ्या झोपेमुळे या घ्रेलिन आणि लेप्टिन या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते, जे तुमची भूक नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या व्यत्ययामुळे उपासमारीची भावना वाढू शकते. ज्यामुळे व्यक्तीची जास्त खाण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे व्यक्ती जास्त कॅलरी वापरायला लागते. जे वजन वाढण्याचे आणखी एक कारण आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आधीच वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर झोपेशी तडजोड करू नका.

मंद चयापचय

मेटाबॉलिज्म स्लो झाल्यामुळे शरीर सुस्त होते. ज्या लोकांचे चयापचय मंद होते, त्यांचे वजनही वाढू लागते आणि पचनाशी संबंधित समस्या त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतात. अनहेल्दी डायट, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, झोपेचा अभाव आणि इतर अनेक गोष्टींमुळे चयापचय मंद होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करण्याचा परिणाम झटपट हवा असेल तर प्रथम तुमची चयापचय क्रिया निरोगी ठेवा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner