मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rose Water for Skin: कडक उन्हातही हवी का रिफ्रेशिंग स्किन? अशा प्रकारे दिवसभर वापरा गुलाब जल

Rose Water for Skin: कडक उन्हातही हवी का रिफ्रेशिंग स्किन? अशा प्रकारे दिवसभर वापरा गुलाब जल

Jun 07, 2024 08:59 PM IST

Summer Skin Care Tips: त्वचेसाठी गुलाब जल खूप फायदेशीर म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचेवर गुलाब जल कसे वापरावे हे जाणून घ्या.

त्वचेवर गुलाब जल वापरण्याची पद्धत
त्वचेवर गुलाब जल वापरण्याची पद्धत (unsplash)

Ways to Use Rose Water on Skin: आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये अनेक जण गुलाब जल वापरतात. विविध उपायांमध्ये सुद्धा गुलाब जल वापरले जाते. गुलाब जल मध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे ते त्वचेसाठी खूप फायदेशीर म्हटले जाते. उन्हाळ्यात तुमची त्वचा फ्रेश राहावी यासाठी सकाळी चेहरा धुतल्यानंतर गुलाब जल वापरण्याचा प्रयत्न करा. त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही ते चेहऱ्यावर स्प्रे करु शकता. उन्हाळ्यात रिफ्रेशिंग स्किन मिळवण्यासाठी दिवसभर गुलाब जल कसे वापरावे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

अशा प्रकारे त्वचेवर वापरा गुलाब जल

फेस टोनर

स्किन केअर रुटीन फॉलो करताना तुम्ही गुलाब जल वापरू शकता. तुमच्या रेग्युलर क्लींजरने चेहरा धुवा आणि नंतर कॉटन बॉलवर गुलाब पाणी घ्या. हे चेहऱ्यावर टॅप करत लावा. असे केल्याने पोर्सेस मधून तेल साफ होईल आणि त्वचा शांत होईल.

फेस पॅक

तुम्ही फेस पॅकमध्ये सुद्धा गुलाब जल वापरू शकता. यासाठी एका वाटीत बेसन, हळद आणि चंदन पावडर घ्या आणि त्यात गुलाब जल टाका. हे चांगले मिक्स करा. हा फेस पॅक तुमच्या त्वचेला थंडावा देईल.

मेकअप रिमूव्हर

तुम्ही गुलाब जलने मेकअप सुद्धा स्वच्छ करू शकता. यासाठी चेहऱ्यावर थोडे गुलाब पाणी लावा आणि नंतर कॉटनने चेहरा स्वच्छ करा. थोडा वेळ तसेच राहू द्या. असे केल्याने त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड होईल.

मिस्ट

दिवसभर फ्रेश राहण्यासाठी गुलाब जल वापरता येते. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जल टाका. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने हे गुलाब जल चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्हाला उन्हाळ्यातही फ्रेश वाटेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel