Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

May 16, 2024 09:18 PM IST

Beauty Tips: प्रत्येक मुलीला लांब दाट पापण्यांची इच्छा असते. याच कारणामुळे आजकाल आयलॅश एक्स्टेंशनचा ट्रेंडही खूप व्हायरल होत आहे. पण जर तुम्हाला तुमच्या पापण्यांना नैसर्गिक पद्धतीने लांब आणि दाट बनवायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.

दाट आणि लांब पापण्यांसाठी पद्धती
दाट आणि लांब पापण्यांसाठी पद्धती (unsplash)

Ways to Grow Thick and Long Eyelashes: दाट आणि लांब पापण्या असलेले सुंदर डोळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. प्रत्येक मुलीला लांब दाट पापण्यांची इच्छा असते. याच कारणामुळे आजकाल आयलॅश एक्स्टेंशनचा ट्रेंडही खूप व्हायरल होत आहे. पण जर तुम्हाला तुमच्या पापण्यांना नैसर्गिक पद्धतीने लांब आणि दाट बनवायचे असेल तर या पद्धतींचा अवलंब करा. घरच्या घरी सोप्या पद्धतीने सुद्धा दाट आणि लांब पापण्या मिळवू शकता आणि आपल्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवू शकता.

एरंडेल तेल

एरंडेल तेलामध्ये फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. यामुळे केसांच्या कूपांचे पोषण देखील होते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले पॉलिफेनॉल केसांच्या वाढीस मदत करतात. त्यामुळे पापण्या जाड आणि लांब होतात. बेस्ट रिझल्टसाठी ग्रीन टी थंड करा आणि रात्री झोपण्यापूर्वी दररोज बोटांनी पापण्यांवर नीट लावा. याने फायदा होईल.

पेट्रोलियम जेली

डोळ्यांच्या पापण्यांवर पेट्रोलियम जेली लावल्याने सुद्धा पापण्या अधिक लांब आणि दाट होतात.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले फिनोलिक कंपाऊंड पापण्यांच्या जलद वाढीस मदत करते. तुमच्या पापण्या दाट करण्यासाठी ते दररोज पापण्यांवर नीट लावा.

व्हिटॅमिन ई

बाजारात उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन ई कॅप्सूल पापण्यांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यामुळे पापण्या पडण्याची आणि पातळ होण्याची समस्या दूर होते. याचा योग्य वापर केल्याने फायदा होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner