Water Weight: वॉटर वेट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणे आणि बचावाचे उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Water Weight: वॉटर वेट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणे आणि बचावाचे उपाय

Water Weight: वॉटर वेट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणे आणि बचावाचे उपाय

Dec 29, 2024 09:17 AM IST

Causes of Water Weight In Marathi: कधी-कधी तुम्ही जागे होतात तेव्हा तुमचे शरीर फुगलेले वाटते. शरीराचे अनेक भाग सुजलेले दिसतात. याचे कारण पाण्याचे वजन म्हणजेच वॉटर वेट आहे. अशा परिस्थितीत, वॉटर वेट काय आहे?

Weight Loss Tips In Marathi
Weight Loss Tips In Marathi (freepik)

What is Water Weight In Marathi:  शरीराचे वजन वाढणे ही एक गंभीर समस्या आहे. ते कमी करण्यासाठी योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात ते इतर अनेक आजारांना जन्म देते. याचे कारण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली आहे. कधी-कधी तुम्ही जागे होतात तेव्हा तुमचे शरीर फुगलेले वाटते. शरीराचे अनेक भाग सुजलेले दिसतात. याचे कारण पाण्याचे वजन म्हणजेच वॉटर वेट आहे. अशा परिस्थितीत, वॉटर वेट काय आहे? आणि त्याची कारणे काय असू शकतात? हे आज आपण जाणून घेऊया....

वॉटर वेट म्हणजे काय?

वॉटर वेट या शब्दाचा अर्थ पाण्यामुळे वाढलेले वजन असा होय. अशा परिस्थितीत जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते. म्हणून त्याला वॉटर वेट असे म्हणतात. हे पाणी शरीराच्या पेशी, उती आणि रक्त अशा विविध भागांमध्ये जमा होते. या कारणामुळे शरीर सुजलेले दिसू लागते.

वॉटर वेटची कारणे-

१) किडनी समस्या

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडाचा आजार असतो तेव्हा तो वॉटर वेटच्या समस्येचा बळी ठरत. कारण मूत्रपिंडांद्वारेच शरीरात साचलेल्या सामान्यपेक्षा जास्त पाणी आणि मीठ काढून टाकण्यास मदत होते.

२) हृदयरोग-

जेव्हा एखादी व्यक्ती हृदयविकाराने ग्रस्त असते तेव्हा त्याला पाण्याच्या वजनाची समस्या देखील असू शकते. अशा परिस्थितीत हृदयविकारावर लवकरात लवकर उपचार करून घ्यावेत.

३) लिव्हरची समस्या-

शरीरात साचलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी यकृताद्वारे म्हणजेच लिव्हरमधून बाहेर पडते. पण जेव्हा यकृताचा त्रास होतो तेव्हा ते नीट काम करत नाही. त्यामुळे वॉटर वेटची समस्या उद्भवते.

४) जास्त मीठ खाणे-

जेव्हा शरीरात सामान्यपेक्षा जास्त मीठ जमा होते तेव्हा वॉटर वेटची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, याचा सामना करण्यासाठी, मिठाचे सेवन कमी करा. जेणेकरून शरीरात सूज येण्याची समस्या टाळता येईल.

५) हे देखील कारण आहे-

पीरियड्स आणि गरोदरपणामुळे अनेकदा महिलांचे वजन जास्त होते. हे हार्मोनल दबावामुळे होते. याशिवाय काही रक्तदाब आणि स्टेरॉईड औषधांमुळे वॉटर वेटची समस्या निर्माण होते.

Whats_app_banner