मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tips and Tricks: पाण्यामुळे तुमच्या बाथरूमचा दरवाजा सडला आहे? या टिप्स येतील कामी!

Tips and Tricks: पाण्यामुळे तुमच्या बाथरूमचा दरवाजा सडला आहे? या टिप्स येतील कामी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 21, 2024 12:09 PM IST

Home Décor: अनेकदा बाथरूममध्ये लावलेला लाकडी दरवाजा पाण्यामुळे खराब होऊ लागतो. तुमच्याकडेही हीच समस्या असेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे बाथरूमचा दरवाजा खराब होण्यापासून वाचवू शकता.

Solutions for rotten bathroom door
Solutions for rotten bathroom door (doorstop.com)

How to protect bathroom door from water: आपण आपल्या घरातील आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतो. आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट सुंदर असावी असं आपल्याला वाटतं. आपण आवर्जून आपल्या घरातील हॉल, बेडरूम आणि किचनला सजवतो. त्याची आवश्यक ती काळजी घेतो. पण आपण घरातील एक महत्त्वाची जागा बाथरूमला विसरतो. बाथरूमचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. तुमच्या घरातील बाथरूमला बसवलेला दरवाजा लाकडाचा असेल तर आणखी काळजी घ्यावी लागते. पाण्यामुळे तो अनेकदा कुजतो आणि त्याला किडेचाही प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीत तुमच्या घराचा लूक खराब होतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

प्लास्टिक पेंटचा वापर

बाजारात अनेक प्रकारचे प्लास्टिक पेंट्स उपलब्ध आहेत. त्या पेंट्स मदतीने, बाथरूमचे गेट सडण्यापासून मोठ्या प्रमाणात वाचवले जाऊ शकते. याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही रचना निवडू शकता.

Home Décor: लाकडी फर्निचर वर्षानुवर्षे टिकवायचं आहे? 'अशी' घ्या काळजी!

तुंग तेलाचा वापर

पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी लाकडी बाथरुमच्या दारावर तुंग तेलाचा लेपही लावू शकता. हे केवळ पाण्यापासून संरक्षण करणार नाही तर तुम्हाला त्यावर एक विशेष चमक देखील मिळेल. तुंग तेल हे खूप चांगले पाणी प्रतिरोधक आहे.

Mumbai: ३२३ स्क्वेअर फूट जागेत बनवला २ बीएचके, बघा कांदिवली अपार्टमेंटचा viral video

प्लास्टिक शीट

जर तुम्ही बाथरूममध्ये लाकडी दरवाजा वाचवण्यासाठी प्रत्येक पद्धतीचा प्रयत्न करून थकला असाल, तर तुम्ही त्याच्या आतील बाजूस म्हणजेच बाथरूमच्या आतील बाजूस प्लॅस्टिकची शीट लावू शकता. पाण्यापासून गेटचे संरक्षण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग