एक-दोन नव्हे तब्बल १०० वर्ष जुनी वाईन! पण पिणार कशी? Viral Video बघाच-watch viral video of 100 years old wine it goes viral on internet ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  एक-दोन नव्हे तब्बल १०० वर्ष जुनी वाईन! पण पिणार कशी? Viral Video बघाच

एक-दोन नव्हे तब्बल १०० वर्ष जुनी वाईन! पण पिणार कशी? Viral Video बघाच

Feb 06, 2024 09:29 PM IST

Viral Video: जर तुम्हाला कोणी शतकभर जुनी वाईन प्यायला दिली तर तिची चव कशी असेल, कधी विचार केला आहे का? सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या १०० वर्ष जुन्या वाईनचा हा व्हिडिओ पाहा.

१०० वर्ष जुन्या वाईनचा व्हायरल व्हिडिओ
१०० वर्ष जुन्या वाईनचा व्हायरल व्हिडिओ

100 Years Old Wine Viral Video: असं म्हणतात की वाईन जेवढी जुनी, तेवढी त्याची चव चांगली असते. जेवणाचा आनंद वाढवण्यासाठी अनेक लोक सोबत वाईन पीतात. सध्या अशाच एका वाईनचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला जातो की ते कमीतकमी १०० वर्षे जुनी वाईन आहे. होय, तुम्ही ते बरोबर वाचलं! 'indianfoodierocks' नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने इंस्टाग्रामवर एक शतकभर साठवलेल्या वाईनचे बॅरल उघडण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, नेटिझन्स यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया देत आहे.

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने चाकूसारख्या धारदार हत्याराने बॅरलचं झाकण काढलं. नंतर त्याने बॅरलचं तोंड उघडलं, ज्याला पानांसारखं काहीतरी गुंडाळलेलं होतं. आणि शेवटी त्याने एका चमच्यात बॅरलमधून वाईन घेतले. सध्या या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १०.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज, ४३२ हजार लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाले आहेत.

 

लोकांच्या या व्हिडिओबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना हे खूप चांगलं वाटलं तर काहींना विश्वासच बसला नाही. "ते १०० वर्ष जुने असल्याचं त्याला कसं कळलं?" असं एका युजरने कमेंटमध्ये विचारलं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, "त्या दारूचा एक घोट घेतला तर ज्याने ती दारू बनवली ती व्यक्ती भेटेल." तिसऱ्या व्यक्तीने कमेंट केली की, “तो पदार्थ जणू बायबलच्या काळातला वाटतोय.” तर एका युजरने "एक घोट स्वर्गासारखा चव देतो. आणखी एक घोट तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो." अशी कमेंट केली आहे.

विभाग