Viral video of Mumbai sunset: जर तुम्ही इन्स्टाग्राम रील 'स्क्रोलर' असाल, तर तुम्ही मंत्रमुग्ध करणार एक रील बघितलंच असेल. त्यामध्ये तुम्हाला त्या भव्य उंच इमारती दिसल्या असतील. या इमारती सोबत होणार सूर्यास्त तुम्ही बघितलंच असेल. हा व्हिडीओ कोणत्या तरी दुसऱ्या देशातील आहे असं वाटतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सुसाट व्हायरल होत आहे. या व्हिज्युअल एक्स्ट्राव्हॅगान्झा सोशल मीडियाला पूर आला आहे. शहराला शोभून दिसणारी उंच-उंच इमारती आणि सन सेट दिसणारा हा व्हिडीओ मुंबईतील आहे. हे खरं वाटतं नसलं तरी हा व्हिडीओ मुंबईतील आहे. नव्याने उदघाटन झालेल्या अटल सेतू पुलावरून हा व्हिडीओ कॅप्चर केला आहे, या व्हिडीओने इंटरनेटला पूर्णपणे मंत्रमुग्ध करून टाकले.
सोशल मीडिया एक्स वर युजर @_Avykt ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अवघ्या १७ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओला १५७.७ हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. अनेक युजर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
लुकलुकणारे दिवे, सुंदर रस्ते आणि दूरवरच्या इमारतींमुळे हा खरोखर भारत असू शकतो का असा प्रश्न लोकांना पडला होता. “स्कायलाइन खरोखरच सुंदर जगाचे स्वरूप दाखवते." एकाने कमेंट केली. “मुंबई गिव्हिंग व्हाईस सिटी व्हायब्स,” दुसऱ्याने कमेंट केली, तर तिसऱ्याने विनोदीपणे नमूद केले, "मी जोपर्यंत हिंदीतील मजकूर वाचत नाही तोपर्यंत मला हा भारतातील नवीन पूल आहे हे समजले नाही."