Health Care: शरीरातील प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात असणे गरजचे असते. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तर शरीर आजरी पडते. असेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरिक अॅसिड. शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण योग्य असले पाहिजे. युरिक अॅसिड वाढल्यामुळे लोकांना सांधेदुखी, हृदय आणि किडनीचे आजार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांचा अवलंब कराता येतो. पण जर तुम्हाला लवकर मुक्तता हवी असेल तर तेही करू शकता. तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनमध्ये औषधांसोबत काही गोष्टींचा समावेश केला तर युरिक अॅसिड वाढण्याची समस्या दूर होऊ शकते. काही घरगुती टिप्स जाणून घ्या ज्यामुळे वाढलेले यूरिक अॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते.
> प्रथिनेयुक्त अन्नाचे सेवन कमीत कमी केले पाहिजे. तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करूच नकात. याऐवजी तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
> यूरिक अॅसिडच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणात ओवा वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्यासोबत ओवाही घेऊ शकता.
> आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. युरिक अॅसिडचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी आवळ्याचा आहारात समावेश करा.
> वाढलेले यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुमच्या आहारात भरपूर व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा समावेश करा.
> वाढलेल्या यूरिक अॅसिडमुळे हैराण असाल तर तुमच्या आहारात सफरचंदाचा समावेश करा आणि रोज सफरचंद खा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)