Health Care: योग्य आहार आपल्याला हेल्दी राहण्यास मदत करतो. निरोगी राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं असते. यासाठी आहारात फळांचा समावेश फार गरजेचा आहे. दररोज एक तरी फळ खाल्ले पाहिजे. फळांमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर असतात. असेच एक फळ म्हणजे किवी (kiwi). किवीमध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यासाठी फायदेशीर तर असतातच. याशिवाय किवी खाल्ल्याने त्वचेलाही अनेक फायदे होतात. तुम्हाला डागरहित त्वचा मिळवायची असेल तर किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय त्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे वजन वाढत नाही. चला जाणून घेऊया किवी खाण्याचे फायदे.
किवी खाल्ल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. पिंपल्ससारख्या समस्या टाळण्यासाठीही किवी फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर डेड स्किन काढण्यासाठीही किवीचा वापर केला जाऊ शकतो. ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी किवीचा वापर फेसपॅक म्हणून करा.
> किवीमध्ये असलेले पोषक तत्व हृदयाला स्ट्रॉंग बनवते.
> बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही किवी खाण्याने फायदे होतात.
> किवी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
> किवी खाल्ल्याने कमी कॅलरीज मिळतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किवी खूप फायदेशीर ठरते.
> किवी खाणे त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. किवी त्वचेला ग्लोइंग करण्यास खूप मदत करते.
> खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी न घेतल्याने अनेकदा पोटात उष्णता निर्माण होते. हे देखील किवी कंट्रोल करते.
> किवीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिड असते, जे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे.
> किवी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात, ज्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या दूर होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या