Personality Development: नकारात्मकता काढून टाकायची आहे? या पद्धतींचा अवलंब करा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Personality Development: नकारात्मकता काढून टाकायची आहे? या पद्धतींचा अवलंब करा!

Personality Development: नकारात्मकता काढून टाकायची आहे? या पद्धतींचा अवलंब करा!

Published Mar 19, 2024 08:35 AM IST

Eliminate Negativity: कामाचा ताण किंवा रोजची तीच कंटाळवाणी लाइफस्टाइल, वैयक्तिक आयुष्यात समस्या अशा अनेक गोष्टी असू शकतात, ज्यामुळे मनात नकारात्मकता येऊ लागते.

Mental health care
Mental health care (freepik)

Healthy Lifestyle: आजकाल आपली लाइफस्टाइल फारच वाईट झाली आहे. ऑफिसमधला कामाचा ताण आणि घरातल्या जबाबदाऱ्यांचं ओझं अशा अनेक गोष्टी एकत्र सुरु असतात. या धावपळीत शरीरच नाही तर मनही थकायला लागतं. यामुळे कधी कधी नकारात्मकता खूप वाढू लागते. अशा परिस्थितीत मनात वाईट विचार येऊ लागतात. गोंधळ, दुःख, बेचैनी, एकटेपणा इत्यादी जाणवू लागतात आणि लाइफस्टाइल बोजड होते. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक जीवनावरही होतो. काही टिप्स अंगीकारून नकारात्मकता दूर करून सकारात्मक राहता येते. तुम्हाला नकारात्मक वाटू लागले असेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही सकारात्मक राहू शकता.

आवडते काम करा

नकारात्मकता टाळण्यासाठी रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या रोज एकच गोष्ट केल्याने कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे तुम्हाला आवडेल असे काम करा.

काही वेळ स्वतःसाठी ठेवा

आनंदी जीवन जगण्यासाठी १५ दिवस किंवा एक महिन्यातुन थोडा वेळ स्वतःसाठी काढा. यामध्ये काम, कुटुंब, मित्र इत्यादी कोणीही सामील नसायला हवं. या काळात सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही तुमचे मन पूर्णपणे नवीन सकारात्मक ऊर्जा गोळा करण्यावर केंद्रित करू शकता. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नैसर्गिक ठिकाणी वेळ घालवणे.

सकारात्मक लोकांच्या जवळ रहा

वैयक्तिक असो किंवा मग व्यावसायिक संबंध असोत, नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. यामुळे तुम्हाला कदाचित काही वेळेसाठी बरोबर वाटणार नाही पण हे दीर्घकालीन आनंदासाठी हे आवश्यक आहे. सकारात्मक राहण्यासाठी, सकारात्मक विचार असलेल्या लोकांशी संगत करणे महत्वाचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner