मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर या लोकांशी असलेले नाते संपवा!

Chanakya Niti: यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर या लोकांशी असलेले नाते संपवा!

Jan 15, 2024 08:38 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti Success Tips: जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि मार्गदर्शक शिक्षक म्हणजे आचार्य चाणक्य. चाणक्य यांनी चाणक्य नीती हे पुस्तक लिहले आहे. त्यांनी नीतीशास्त्रमध्ये यशस्वी होण्याचे मार्ग स्पष्ट केले आहेत. चाणक्य नीती सांगते की एखाद्या व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे. चुकीच्या सवयी आणि चुकीच्या माणसांचा सहवास यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीलाही मागे खेचतो आणि यशस्वी होण्यापासून रोखतो. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. काय म्हणतात चाणक्य ते जाणून घेऊयात...

ट्रेंडिंग न्यूज

'राजा राष्ट्रकृतम् पापम् राज्यः पापम पुरोहितः।

भरता च स्त्रीकृत पं शिस्पां पं गुरस्ता...'

दुसऱ्यांच्या पापांची शिक्षा भोगावी लागते

या श्लोकात अशा लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांना कोणतीही चूक न करता इतरांच्या पापांची शिक्षा भोगावी लागते. हे लोक असतात राजा-प्रजा, गुरु-शिष्य आणि पती-पत्नी. जो व्यक्ती चुकीचे किंवा वाईट कृत्य करतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतातच पण कधी-कधी इतरांच्या वाईट कर्मांचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात.

राजा-प्रजा

देशाच्या शासकाने कोणतेही चुकीचे काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण देशातील जनतेला भोगावे लागतात. त्यामुळे राज्यकर्त्याने योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही उच्च पदावरील वाईट व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करू नका, तो कधीही तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

गुरु-शिष्य

गुरूचे काम शिष्याला मार्ग दाखवणे, योग्य गोष्टी शिकवणे आहे. जर गुरू योग्य नसेल तर अशा गुरूपासून अंतर ठेवणे चांगले. त्यामुळे तुमच्या गुरूची निवड हुशारीने करा.

पती-पत्नी

पती-पत्नी एकाच रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. पण जर दोघांपैकी एक दुष्ट असेल, गैरवर्तन करत असेल किंवा फसवणूक करणारा असेल तर दुसऱ्याने त्याच्याशी असलेले नाते संपवले पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel
विभाग