मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Korean Face Mask: ग्लोइंग त्वचा हवीये? घरी बनवा कोरियन फेस पॅक!

Korean Face Mask: ग्लोइंग त्वचा हवीये? घरी बनवा कोरियन फेस पॅक!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 10, 2024 06:43 PM IST

Glowing Skin: कोरियन स्किन केअर फारच प्रसिद्ध आहे. याचा वापर करून तुम्ही ग्लोइंग त्वचा मिळवू शकता.

Rice face mask
Rice face mask (Pexels)

Skin Care: स्कीन केअरमध्ये सगळ्यात जास्त बोलबाला आहे तो म्हणजे कोरियन स्किन केअर चा. जगभरात त्यांच्या पद्धती त्यांचे प्रॉडक्ट्स फेमस झाले आहेत. पण ते महागडे आहेत. यावर उपाय म्हणून तुम्ही घरीच हे प्रॉडक्ट्स बनवू शकता. आपण विविध घरगुती उपायांच्या मदतीने स्किन केअर करू शकतो. कोरियन फेस मास्क खूप प्रसिद्ध झाला आहे. याचे कारण असे की कोरियन महिलांची त्वचा नेहमीच तरुण वाटते. त्यांच्या त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम दिसते. म्हणूनच, आपण आज सोपा कोरियन फेस मास्क तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत. हा फेस पॅक तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

कसा बनवायचा फेस मास्क?

सगळ्यात आधी मंद आचेवर पॅन ठेवा आणि त्यात १ ग्लास पाणी घाला.

आता त्यात १ चमचा तांदळाचे पीठ मिक्स करा.

जेव्हा हे मिश्रण क्रीमसारखे बनते तेव्हा त्यात १ चमचा मध मिसळा आणि पेस्ट तयार करा.

ते चांगले तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हा मास्क चेहऱ्यावर सुमारे १० मिनिटे ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

तुमचा चेहरा कसा चमकला आहे ते पहा.

हा मास्क तुम्ही आठवड्यातून २ ते ३ दिवस वापरू शकता.

काय मिळतात फायदे?

जेवणासोबतच भात स्किन केअर मधेही वापरू शकता. हे त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेला ग्लोही येतो आणि डागही कमी होतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठीही हे गुणकारी आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग