Tips for bouncy hair: अनेकांचे केस फार पातळ असतात. पण प्रत्येकाला काळे, दाट आणि जाड केस हवे असतात. अनेकांचे केस फार सपाट असतात त्यात अजिबातच बाउन्स नसतो. जर तुमचे केस खूप पातळ आहेत आणि तुम्हाला ते दाट, जाड आणि बाऊन्सी बनवायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सला फॉलो करून तुम्ही तुमच्या केसांचा कायापालट होऊ शकतो. केस बाऊन्सी न होण्यामागे केस धुताना होणाऱ्या चुका असतात. यामुळे केसांचा दर्जा खराब होतो. त्यामुळे विलंब न करता केस बाऊन्सी बनवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घ्या.
> केस दाट आणि बाऊन्सी करायचे असतील तर केमिकल प्रोडक्ट्सचा वापर टाळावा. त्यामुळे केसांची चमक कमी होते. यामुळे केसांचे नुकसान होते.
> याशिवाय केसांना रेगुलर तेल लावायला विसरू नका. स्कॅल्प मसाज करा. हे केल्याने रक्त परिसंचरण सुधारते. यामुळे केस दाट होतात.
> केस धुतल्यानंतर आवर्जून कंडिशनर लावा. यामुळे केस दाट होतात आणि केसांची चमकही वाढते.
> याशिवाय केस जास्त धुणे टाळा. यामुळे केसांमधील ओलावा नाहीसा होऊ शकतो.
> पातळ केस जाड दिसण्यासाठी बँक कोम्बिंग करणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचे केस पातळ आणि चिकट दिसण्याऐवजी जाड आणि बाऊन्सी दिसू लागतात.
> हेअर स्प्रे लावून तुम्ही तुमचे केस बाऊन्सी बनवू शकता. पण लक्षात ठेवा चांगल्या ब्रँडच्या हेअर स्प्रेने केसांना दोन भागात स्प्रे करा. हेअर स्प्रे केसांना बाऊन्सी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
आवळ्याचा रस केसांसाठी फार उपयुक्त आहे. याचा रस तुम्ही पिऊ शकता किंवा त्याची पावडर बनवून केसांना लावू शकता. आवळा पावडर मेंदीमध्ये मिसळूनही तुम्ही तुमचे केस काळे करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)