Health Care Tips: नेहमी आरोग्यदायी सकाळ होणे गरजेचे असते. यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थांचे सेवन करणे. सकाळ उत्तम झाली आणि सकाळी नाश्ता उत्तम झाला की दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. सकाळी फळे आणि सुक्या मेव्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते. असाच एक सुका मेवा म्हणजे अक्रोड, जे शरीर निरोगी ठेवते. पोषक तत्वांनी युक्त अक्रोडाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. रोज सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने शरीर ऊर्जावान राहते. याशिवाय शारीरिक आणि मानसिक विकासातही मदत होते. चला जाणून घेऊयात इतर फायदे...
> अक्रोडा हे उबदार असतात. यामुळे हिवाळ्यात ते जास्त खाल्ले जातात. पण उन्हाळ्यात अक्रोड खाणेही फायदेशीर ठरेल.
> रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी अक्रोड खाऊ शकता. भिजवल्याने त्याचा गरमी कमी होते आणि ते मऊही होतात.
> अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते. ही अशी एक आरोग्यदायी चरबी आहे, जी हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
> अक्रोड हे अँटिऑक्सिडंट्सने युक्त आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
> यामुळे छातीती जळजळ कमी होते.
> अक्रोडला कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ देखील मानले जाते, ज्यामुळे त्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने देखील भरपूर ऊर्जा मिळते.
> अक्रोडातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे वाढते वजन कमी होण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
> रोज अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय टाइप २ मधुमेह होण्याची शक्यताही कमी असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या